Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; २५६९ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत २५६९ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

रेल्वेत २५६९ पदांसाठी भरती

रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केली भरती

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्डाने तब्बल २५६९ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वे भराती बोर्डाने प्रयागराज झोनमध्ये ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेत ज्युनिअर इंजिनियर, डेपो मटेरियल, सुपरिटेंडेंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती सीईएन 05/2025 अंतर्गत होणार आहेत. यामध्ये सिविल, मेकॅनिकल, सिग्नलिंग आणि आयटी विभागात भरती केली जाणार आहे. त्यामुळे इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा डिग्री केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरुदेखील झाली आहे. ३१ ऑक्टोबरपासून तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

प्रयागराज आरआरबी उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, बनारस लोकोमोटिव वर्क्स यासाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये १०९० पदे सामान्य प्रवर्गासाठी आहेत. इतर पदे राखीव प्रवर्गासाठी ठेवण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५,४०० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा? (RRB Recruitment Application Process)

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला rrbapply.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर प्रयागराजच्या rrbpryj.gov.in या प्रादेशिक साइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला अकाउंट तयार करावे लागेल आणि फॉर्म भरावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये शुल्क भरायचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे. यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये टेक्निकल विषयांची परीक्षा होणार आहे. यानंतर मेडिकल टेस्ट आणि कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Sneezing : वारंवार शिंका येतात? 'हे' घरगुती उपाय येतील कामी, मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT