Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी

Pune Holi Celebration Light Girder Accident: पुण्यामध्ये होळीनिमित्त आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली. लाईटचा गर्डर अचानक तरुणांच्या अंगावर पडला. १६ जण जखमी झाले आहेत.
Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी
Pune Holi CelebrationSaam tv
Published On

Summary -

• पुण्यात होळी सेलिब्रेशनदरम्यान मोठी दुर्घटना
• लाईटचा गर्डर कोसळून १६ जण जखमी
• जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले
• पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये होळी सेलिब्रेशन करताना मोठी दुर्घटना घडली. होळीच्या कार्यक्रमात नाचत असताना अचानक लाइटचा गर्डर पडला. या घटनेत १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे होळीच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क - मुंढवा रोडवरील रॉयल फॉर्ममध्ये होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होळी सेलिब्रेशनसाठी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी हजेरी लावली होती. सर्वजण डीजेच्या तालावर नाचत होते. त्याचवेळी अचानक लाईटचा गर्डर नाचत असलेल्या तरुणांच्या अंगावर पडला. या घटनेमध्ये १६ जण जखमी झाले ४ जणांना उपचारासाठी ससूनला हलवण्यात आले आहे.

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी
Pune Crime: तरुणी लिफ्टने आठव्या मजल्यावर आली अन्...; आत्महत्येच्या घटनेनं वाघोली हादरली

ही घटना घडल्यानंतर कार्यक्रम थांबवण्यात आला. घटनास्थळावर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. ही घटना घडली त्यावेळी घाबरून सर्वजण इकडे तिकडे पळू लागले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लाईटचा गर्डर कसा पडला यामागचे कारण समोर आले नाही.

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com