Rajya Sabha Elections: भाजपकडून 9 उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाले तिकीट? वाचा यादी

Rajya Sabha Elections 2026 : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनाही उमेदवारी दिली आहे. भाजपने बिहारमधून राज्यसभेसाठी नितीन आणि शिवेश राम यांना उमेदवारी दिली आहे
Rajya Sabha Elections 2026
BJP releases list of nine candidates for the Rajya Sabha elections, including National President Nitin Naveen from Bihar.saam tv
Published On
Summary
  • भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी ९ उमेदवारांची यादी जाहीर केली.

  • राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

  • बिहारमधून नितीन नवीन आणि शिवेश राम यांना संधी.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनाही उमेदवारी दिली आहे. भाजपने बिहारमधून शिवेश रामला राज्यसभा उमेदवार बनवण्यात आले आहे. निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे तर मतदान १५ मार्च रोजी होणार आहे. मतमोजणीही त्याच दिवशी होईल.

Attachment
PDF
PRESS RELEASE - List of BJP candidate for Biennial Election to the Rajya Sabha from different states 03.03.2026
Preview
Rajya Sabha Elections 2026
US-इस्रायलविरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाचं सर्व राज्यांना पत्र, पुण्यात वाढवली गस्त

भाजपने मंगळवारी सहा राज्यांमधील नऊ राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु पक्षाने अद्याप महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. पक्षाने हरियाणामधून राज्यसभेसाठी संजय भाटिया आणि पश्चिम बंगालमधून राज्यसभेसाठी राहुल सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा आणि ओडिशामधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन शामल आणि सुजित कुमार यांना उमेदवारी दिली आहे. आसाममधून तारश गोवाला आणि जगनमोहन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Rajya Sabha Elections 2026
Vidhan parishad Leader: राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडीचा लागणार निकाल?

राज्यसभेच्या ३७ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, धैर्यशील पाटील, भागवत कराड हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉ. संगीता फुसाटे यांच्या नावांचा समावेश असल्याचे सांगितलं जातंय. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मागील आठवड्यात नवी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र भाजपकडून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यासंदर्भातील नावं सुचवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com