World Glaucoma Week : काचबिंदू या 'सायलेंट थीफ ऑफ साइट' बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Glaucoma Week : काचबिंदू हे भारतातील अपरिवर्तनीय अंधत्वाचे प्रमुख कारण आहे, ज्‍याचा 12 दशलक्षांहून अधिक व्‍यक्‍तींवर प्रभाव पडला आहे.
World Glaucoma Week
World Glaucoma WeekSaam Tv
Published On

Glaucoma Symptoms : काचबिंदू हे भारतातील अपरिवर्तनीय अंधत्वाचे प्रमुख कारण आहे, ज्‍याचा 12 दशलक्षांहून अधिक व्‍यक्‍तींवर प्रभाव पडला आहे. या आजाराला अनेकदा ‘सायलेंट थीफ ऑफ साइट’ म्‍हणून संबोधले जाते.

कारण सामान्‍यत: हा आजार हळूहळू विकसित होत जातो आणि दृष्‍टी कमी होण्‍यास विलंब होईपर्यंत कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. यंदा जागतिक काचबिंदू सप्‍ताहानिमित्त या दुर्बल डोळ्यांच्या आजाराबद्दल तुम्हाला माहित असावी अशी आवश्‍यक माहिती सांगण्‍यात आली आहे.

World Glaucoma Week
Child Eye Care Tips : पालकांनो, वाढत्या वयात अशी घ्या मुलांच्या डोळ्यांची काळजी !

सुरुवातीच्या टप्प्यात काचबिंदूमध्ये सहसा कोणतीही लक्षणीय लक्षणे दिसून येत नाहीत. आजार जसजसा वाढत जातो, तसतसे अस्पष्ट किंवा अंधुक दृष्टी, परिघीय दृष्टी कमी होणे, दिव्यांभोवती हेलोस दिसणे किंवा डोळा दुखणे अशी लक्षणे उद्भवतात.

तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे (Symptoms) दिसल्यास त्‍वरित नेत्ररोगतज्ज्ञांना भेट देणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, दृष्टी कमी होण्यापासून रोखण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे नियमित डोळे तपासणी, विशेषत: 40 वर्षांवरील व्‍यक्‍तींनी लवकर निदानासाठी ही तपासणी करणे आवश्‍यक आहे. काचबिंदू असलेल्या रुग्णांवर आय ड्रॉप्‍स आणि ओरल थेरपीसह औषधोपचार केले जाऊ शकतात. या आजाराचे (Disease) निदान झाल्यानंतर निर्धारित औषधांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

World Glaucoma Week
Eye Care Tips : बदलत्या हवामानाचा डोळ्यांवर होतोय परिणाम, कशी घ्याल काळजी

लिलावती हॉस्पिटल अॅण्‍ड रिसर्च सेंटरचे ऑफ्थॅल्‍मोलॉजिस्‍ट, ग्‍लुकोमा सोसायटी ऑफ इंडिया, मुंबईचे सदस्‍य डॉ. मनिष शाह म्‍हणाले, ‘‘काचबिंदू अनेक वर्षांपासून हळूहळू विकसित होत जातो आणि त्‍यामध्‍ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. माझ्या प्रॅक्टिसमध्ये, आमच्या लक्षात आले आहे की 70 टक्‍के रूग्ण फक्त एकदाच तपासणीसाठी आले आहेत, ज्यांना काही प्रमाणात अंधत्वाची लक्षणे दिसून आली.

म्हणूनच, विशेषत: तुम्हाला आजाराचा कौटुंबिक इतिहास किंवा इतर जोखीम घटक असतील तर नियमित डोळ्यांची तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. लवकर निदान व उपचार केल्याने, आपण आजाराची प्रगती मंद करू शकतो आणि दृष्टी कमी होणे टाळू शकतो.

तुमचे डोळे व संपूर्ण आरोग्याचे रक्षण करण्याच्‍या दिशेने पावले उचलून तुम्ही तुमचा काचबिंदू होण्याचा धोका कमी करू शकता आणि आयुष्यभर दृष्टी चांगली ठेवता येईल याची खात्री घेऊ शकता.’’

काचबिंदू (ग्‍लुकोमा) हा डोळ्यांच्या आजारांचा एक समूह आहे, ज्यामुळे ऑप्टिक मज्जातंतूचे सतत नुकसान होते, ज्यावर उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते. 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये हा आजार सामान्‍य असला तरी काचबिंदूमुळे व्यक्तीच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये मोठे अडथळे येतात.

खाली काही सोप्‍या टिप्‍स दिल्‍या आहेत, ज्‍या तुमच्‍या स्‍वत:च्‍या व प्रियजनांच्‍या डोळ्यांचे काचबिंदू होण्‍यापासून संरक्षण करण्‍यास आणि आयुष्‍यभर दृष्‍टी उत्तम राहण्‍यास मदत करू शकतात -

  • नियमित डोळ्यांची तपासणी: डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डोळ्यांची नियमितपणे तपासणी करणे, विशेषत: काचबिंदूचा कौटुंबिक इतिहास किंवा इतर जोखीम घटक असल्यास डोळ्यांची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. डोळ्यांचे नियमित निरीक्षण केल्याने काचबिंदूचे लवकर निदान होण्‍यास मदत होते. आजाराचे लवकर निदान झाल्‍याने दृष्टीचे संरक्षण होण्‍यासोबत दृष्टी कमी होण्याला प्रतिबंध करण्यास देखील मदत होऊ शकते.

  • आय प्रोटेक्‍शन परिधान करा: आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. डोळ्याच्या गंभीर दुखापतीमुळे काचबिंदू होऊ शकतो. पॉवर टूल्स वापरताना किंवा खेळ खेळताना आय प्रोटेक्‍शन घाला. अतिनील किरणे देखील डोळ्यांसाठी हानीकारक असतात. तुम्ही बाहेर असता तेव्हा 100 टक्‍के अतिनील किरणांना रोखणारे सनग्लासेस आणि तुमच्या डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी टोपी घाला किंवा तुम्ही आधीपासून रेटिना किंवा डोळ्यांचे उपचार घेत असाल तर तज्ञांनी सांगितलेला चष्मा वापरा.

  • प्रीस्‍क्राईब केलेली औषधे घ्‍या: काचबिंदूचे निदान झाले असेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे, तसेच सांगितलेल्या औषधांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. ग्‍लुकोमा आय ड्रॉप्‍समुळे डोळ्यांच्या उच्च दाबाने काचबिंदूमध्ये वाढ होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. कोणतीही लक्षणे नसली तरीही नेत्ररोगतज्ज्ञाने सांगितल्यानुसार आय ड्रॉप्‍सचा वापर करा.

  • नियमित व्यायाम: नियमितपणे व्यायाम केल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या परिस्थितींना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते, या आजारांमुळे डोळ्यांच्या दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमची दृष्टी खराब होऊ शकते. व्यायामामुळे डोळ्यातील रक्तवाहिन्या निरोगी होतात. संशोधनामधून निदर्शनस येते की, नियमित व्यायामामुळे डोळ्यांच्‍या आजारांपासून संरक्षण होते.

  • आरोग्यदायी आहार: तुमचा आहार रेटिनल आरोग्य जपण्यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हिरव्या पालेभाज्या आणि फळांनी संपन्‍न आहार सेवन केल्‍यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दररोज भरपूर पालेभाज्या व रंगीत फळे, बेरी आणि भाज्या खा. त्यामध्ये जीवनसत्त्वे व खनिजे असतात, जी तुमच्या शरीराचे आणि डोळ्यांचे संरक्षण करतात.

  • काचबिंदू हा असंसर्गजन्य, गंभीर डोळ्यांचा आजार आहे, ज्यासाठी दीर्घकाळापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. जागतिक काचबिंदू सप्ताह हा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणारा वार्षिक इव्‍हेण्ट आहे. या इव्‍हेण्‍टचा का‍चबिंदूचे लवकर निदान व उपचार करण्‍याच्‍या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवण्‍याचा मनसुबा आहे. हे महत्त्वाचे आहे की, आपण योग्य जागरूकतेसह या सायलेंट थीफ ऑफ साइटचा सामना करून स्वतःचे आणि भावी पिढीचे दृष्टीदोष होण्यापासून संरक्षण केले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com