Child Eye Care Tips : पालकांनो, वाढत्या वयात अशी घ्या मुलांच्या डोळ्यांची काळजी !

How To Protect Children's Eyes : आई आणि वडील या दोघांनाही चश्मा असेल तर मुलांना चश्मा लागण्याची शक्यता वाढलेली असते.
Child Eye Care Tips
Child Eye Care TipsSaam Tv
Published On

How to Take Care Of Children's Eyes : कोरोना उद्रेकामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये मुलांचे मैदानी खेळ कमी झाले. लहान मुलांच्या डोळ्याला सतत फक्त जवळचे पाहण्याची सवय लागली. ही डोळ्याचे आरोग्य बिघडायची सुरवात ठरते. डोळ्यांना जवळचे अगदी स्पष्ट दिसते. मात्र, काही अंतरावरचे पहायचे, वाचायचे म्हटले की, चश्मा वापरावा लागतो. अशा मुलांचे प्रमाण आता वेगाने वाढताना दिसते.

आई आणि वडील या दोघांनाही चश्मा असेल तर मुलांना चश्मा लागण्याची शक्यता वाढलेली असते. त्याला चश्मा लागण्याचे आनुवंशिक कारण म्हटले जाते. आई-वडिलांकडून आलेला मूलभूत चश्म्याचा नंबर आणि मुले घरात (Home) बसून राहीली, मैदानी खेळ खेळले नाहीत, तर अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) वाढणारा नंबर अशा दोन प्रमुख कारणांनी मुलांना चश्मा लागतो, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञांनी दिली.

Child Eye Care Tips
Child Care Tips : तुमचे मुलंही झोपेत अंथरुण ओले करते ? मग 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

देशात साडेसात टक्के मुलांना चश्मे लागतात. हा वयोगट 5 ते 15 वर्षांचा आहे. विशेषतः ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांतील मुलांमध्ये चश्म्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते. देशभरात 2050 पर्यंत याच वयोगटातील 48 टक्के मुलांना चश्मे असतील, असे एका अभ्यासात नोंदविण्यात आले आहे. म्हणजे, साडेसात टक्क्यांपासून ते 48 टक्क्यांपर्यंत चश्मा लागणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढेल, असेही या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुलाला कमी दिसत असेल, तर शाळेतून मुलाची तक्रार येईपर्यंत पालकांनी वाट बघू नये. डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन मुलाच्या डोळ्याची सामान्य तपासणी करून घ्यावी. या मुलांना मोठ्या माणसांप्रमाणे लगेच चश्म्याचा नंबर दिला जात नाही. कारण, लहान मुलांमध्ये डोळ्याची फोकसिंग पॉवर चांगली. त्यामुळे नुसता नंबर काढला तर त्यात त्रुटी राहण्याची शक्यता असते. त्यासाठी मुलांच्या डोळ्यात ड्रॉप टाकून डोळ्यांची (Eye) तपासणी केली जाते. त्यानंतर अचूक नंबर दिला जातो.

Child Eye Care Tips
Eye Care Tips : बदलत्या हवामानाचा डोळ्यांवर होतोय परिणाम, कशी घ्याल काळजी

प्रत्येक तीन ते सहा महिन्यांनंतर मुलांच्या डोळ्याच्या नंबरची तपासणी करणे अनिवार्य असते. कारण, वयाबरोबरच चश्म्याचा नंबर वाढण्याची शक्यता असते. जितक्या लहान वयात मायोपियाचे निदान होते, तितक्या लवकर नंबर वाढण्याची शक्यता वाढते. भविष्यात मायोपिमुळे मुलांच्या डोळ्यात काही गुंतागुंत होण्याची भीती असते. डोळ्याचा पडदा सरकरणे, मोतीबिंदू, डोळ्यातील दाब वाढून काचबिंदूची सुरवात होणे अशा गुंतागुंतीची शक्यता वाढते, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अभय वैद्य यांनी दिली.

चश्म्याचा नंबर टाळण्यासाठी वैद्यकशास्त्रात ठोस कोणतेही प्रतिबंधक उपाय नाहीत. योग्य जीवनशैली आणि पोषक आहार हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात. पाच ते सात वर्षांच्या मुलांमध्ये डोळे आणि हात यात समन्वय महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने पालकांनी प्रयत्न केला पाहिजे. तसेच, ऑनलाइन शाळा, क्लासेस यामुळे स्क्रीनवर जवळचे बघण्याची सवय मुलांना लागली आहे. ती बदलण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची वेळ आता आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com