Unnikrishnan death
K.P. Unnikrishnan deathSaam tv

धुळवडीच्या दिवशी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर; माजी केंद्रीय मंत्र्यांचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

K.P. Unnikrishnan death : धुळवडीच्या दिवशी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी केंद्रीय मंत्री केपी उन्नीकृष्णन निधन झालं आहे.
Published on
Summary

ज्येष्ठ काँग्रेस नेते केपी उन्नीकृष्णन यांचं निधन

कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

व्ही.पी. सिंग सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलं होतं

धुळवडीच्या दिवशी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री केपी उन्नीकृष्णन यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं आहे. केरळच्या कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी माजी केंद्रीय मंत्री केपी उन्नीकृष्णन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

केपी उन्नीकृष्णन यांचा जन्म १९३६ साली झाला होता. केपी यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवलं होतं. ते ५ वेळा लोकसभा निवडणुकीत जिंकून खासदार झाले. वीपी सिंह सरकार यांच्या कार्यकाळात दूरसंचार, जहाजबांधणी मंत्री होते. १९९० साली आखाती युद्धादरम्यान भारतीयांना बाहेर काढण्यात उन्नीकृष्णन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Unnikrishnan death
CISF जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; डोंबिवली परिसरात हळहळ

लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उन्नीकृष्णन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'केपी उन्नीकृष्णन यांच्या निधनाने अत्यंत दु:खी आहे. त्यांनी पूर्ण आयुष्य जनसेवेसाठी आयुष्य समर्पित केलं. त्यांचे कुटुंबीय,मित्र आणि केरळ जनतेप्रति संवेदना व्यक्त करतो. त्यांची नेहमी आदराने आठवण काढली जाईल'.

Unnikrishnan death
महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला? महत्वाची माहिती समोर

तत्पूर्वी, केरळच्या राजकारणात उन्नीकृष्णन यांचं विशेष स्थान होतं. केपी यांनी दिर्घकाळ काँग्रेससोबत राहिले. त्यांनी आणीबाणीच्या काळात टीका देखील केली. उन्नीकृष्णन यांनी १९६० साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९६२ साली ते काँग्रेस कमिटीचे सदस्य झाले होते. १९७१ साली वडाकारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. केपी यांनी १९७७, १९८०, १९८४, १९८९ आणि १९९१ साली खासदार म्हणून निवडून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com