Railway Jobs Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप डी पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Railway Recruitment 2024: रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या ग्रुप डी पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करावी, अशी अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या स्काउट्स आणि गाइट कोट्यअंतर्गत ग्रुप डी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.rrcpryj.org या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. (Railway Jobs)

या भरती मोहिमेत मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमीडिएट परीक्षा पास केलेली असावी. त्याचसोबत बॅचलर आणि पदव्युतर पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव प्रवर्गात सूट देण्यात आली आहे.

या नोकरीबाबत सर्व माहिती रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ५०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये फी भरावी लागणार आहे. (Railway Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज कसा करावा? (How To Apply For Railway Job)

या भरती मोहिमेत अर्ज करताना सर्वप्रथम rrcpryj.org या वेबसाइटला भेट द्या.

त्यानंतर होमपेजवरील नोटिफिकेशनवर जावे लागेल.

यानंतर भरती संबंधित अर्जावर क्लिक करावे लागेल.

यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.

यानंतर अर्जप्रक्रिया पूर्ण करुन महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

Solapur Politics: उत्तम जानकरांनी खूप त्रास दिला, खोटे गुन्हे दाखल केले; मोहिते पाटील यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT