CIDCO Lottery : सिडकोच्या घरासाठी अर्ज करताय? कागदपत्रे कोणती, अर्ज कसा भराल? सर्व माहिती एका क्लिकवर

How To Apply For CIDCO Lottery: सिडकोच्या घरांसाठी ७ ऑक्टोबरला लॉटरी निघणार आहे. २६ हजार घरांची ही लॉटरी निघणार आहे. यासाठी कसा अर्ज करायचा आणि काय कागदपत्र लागणार याची सर्व माहिती वाचा एका क्लिकवर...
CIDCO Lottery 2024: दसऱ्याआधी सिडकोच्या २५ हजार घरांची बंपर लॉटरी, आवडत्या घराची कशी कराल निवड? वाचा सविस्तर
CIDCO Bumper Lottery Of 25 Thousand HousesSaam Tv
Published On

नवी मुंबईमध्ये स्वत:चे घर असावे असं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून या लॉटरीबद्दल चर्चा सुरू होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर ही लॉटरी निघणार असल्याचे सांगितले जात होते. पण अखेर या लॉटरीचा मुहूर्त ठरला असून सिडकोकडून लॉटरीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सिडकोच्या घरांसाठी ७ ऑक्टोबरला लॉटरी निघणार आहे. २६ हजार घरांची ही लॉटरी निघणार आहे. यामुळे नवी मुंबईतील घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

स्वत:च्या मालकीचे होणार घर -

सिडकोच्या बोर्ड मिटिंगमध्ये लॉटरीचा मुहूर्त ठरला आहे. ७ ऑक्टोबरला ही लॉटरी निघणार आहे. सिडकोची ६७ हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असून पहिल्या टप्प्यामध्ये २६ हजार घरांची लॉटरी निघणार आहे. सिडकोची लॉटरी निघणार असल्यामुळे घर घेणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर स्वत:च्या मालकीचे होणार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला घर विकण्यापूर्वी सिडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागणार नाही. त्यामुळे नागरिकांना सिडकोच्या घरांची खरेदी-विक्री करणं अधिक सोपं होणार आहे.

कुठे असणार सिडकोची घरं?

सिडकोची ही घरं तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडेसह मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाठ हे आज विविध भागांमधील गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामाची पाहणी करणार आहेत. सिडकोच्या या लॉटरीमध्ये नागरिकांना त्यांच्या आवडीचे घर निवडण्याची संधी असणार आहे. त्यामुळे याचा नागरिकांना चांगला फायदा होईल.

CIDCO Lottery 2024: दसऱ्याआधी सिडकोच्या २५ हजार घरांची बंपर लॉटरी, आवडत्या घराची कशी कराल निवड? वाचा सविस्तर
CIDCO Lottery 2024: दसऱ्याआधी सिडकोच्या २५ हजार घरांची बंपर लॉटरी, आवडत्या घराची कशी कराल निवड? वाचा सविस्तर

सिडको लॉटरीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे -

- पॅन कार्ड,

- आधार कार्ड

- अधिवास प्रमाणपत्र

- उत्पन्नाचा दाखला

- मतदार ओळखपत्र

- पासपोर्ट आकाराचे फोटो

- जन्म प्रमाणपत्र

- अर्जदारांचा पत्ता

- अर्जदाराचे बँक डिटेल्स

सिडको लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? -

- CIDCO च्या अधिकृत https://lottery.cidcoindia.com वेबसाइटवर जा.

- अर्ज करण्यासाठी 'Register for lottery' हा पर्याय निवडा.

- यावर तुमचा पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याचे डिटेल्स टाका.

- सर्व आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी डिजिटल स्वरूपात अपलोड करा.

- तुम्ही भरलेला ऑनलाइन अर्ज व्यवस्थित वाचा आणि सर्व तपशील एकदा तपासा.

- तुम्ही भरलेली सर्व माहिती व्यवस्थित असल्यास अर्ज सबमिट करा.

- नोंदणी शुल्क भरा.

- नोंदणी शुल्क भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या उत्पन्न गटानुसार पैसे भरा.

- पेमेंट करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड या पर्यायांचा वापर करून शकता.

- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू घ्या.

CIDCO Lottery 2024: दसऱ्याआधी सिडकोच्या २५ हजार घरांची बंपर लॉटरी, आवडत्या घराची कशी कराल निवड? वाचा सविस्तर
CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com