तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. मुंबई हायकोर्टात सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत संसाधन कर्मचारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यातआली आहे.
मुंबई उच्च न्यायलयातील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२४ आहे. ४९ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. रिसोर्स पर्सोनल पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. (Bombay High Court Recruitment)
मुंबई उच्च न्यायालयातील या भरतीसाठी बॉम्बे हाय कोर्टातील निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी अर्ज करु शकतात.ग्रुप ए आणि ग्रुप सी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. मुंबई हाय कोर्टातील या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर येथे पोस्टींग केली जाणार आहे.
हाय कोर्टातील या भरतीसाठी उमेदवारांनी रजिस्टार (पर्सनल), हाय कोर्ट, एॅपलट साइड, मुंबई, पाचवा मजला, नवीन मंत्रालय बिल्डिंग, जी. टी. हॉस्पिटल कंपाउंट, क्रॉफर्ड मार्केटजवळ, एल.टी. मार्ग, मुंबई येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३१,०६४ रुपये मानधन मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करु शकतात. (Government Job)
सध्या यूआयडीएआयमध्ये भरती सुरु आहे. आधार कार्ड बनवणारी आणि रेगुलेट करणारी ही संस्था आहे. केंद्र सरकारच्याअंतर्गत ही संस्था काम करते. यूआयडीएआमध्ये हैदराबाद येथे ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.