Railway Recruitment 2026 Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २१९९७ रिक्त पदे; अर्ज करण्याची मुदत वाढवली, शेवटची तारीख काय?

Railway Group D Recruitment 2026: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

२१९९७ पदांसाठीभरती

अर्ज करण्याची मुदत वाढवली

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. त्यामुळे तरुणांना नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

रेल्वे भरती बोर्डाने २१९९७ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी शेवटची तारीख २ मार्च होती. तर अॅप्लिकेशन फी भरण्याची शेवटची तारीख ११ मार्च करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

रेल्वे ग्रुप डी पदांसाठी असिस्टंट ब्रिज, लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स, असिस्टंट पी-वे, असिस्टंट ट्रॅक मशीन, पॉइंट्समॅन पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

रेल्वे ग्रुप डी पदांसाठी अर्जप्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरु झाली आहे. आता ११ मार्चपर्यंत अर्ज करु शकतात.१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, पीईटी, कागदपत्र पडताळणी, मेडिकल आणि मेरिट लिस्टद्वारे होणार आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना बेसिक सॅलरी १८००० रुपये मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये फी भरायची आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये फी भरायची आहे.

पात्रता

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. आयटीआय प्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्यामळे या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT