

मध्य रेल्वेकडून रविवारी मेगाब्लॉक
मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वेचं वेळापत्रक आलं समोर
सीएसएमटी ते विद्याविहार लोकल मार्गात बदल
मयूर राणे, साम टीव्ही
मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागात मेगाब्लॉक असणार आहे. मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर ही मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहारदरम्यान १०.५५ ते १५.५५ पर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी १५.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. तसेच विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.
घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी १५.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गाचं कसं असेल वेळापत्रक?
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी १५.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी विभागांवर विशेष उपनगरीय सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक काळात ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांवरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.