Kokan Railway Jobs: खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी; या पदांसाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?

Kokan Railway Recruitment 2026: कोकण रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोकण रेल्वेत सध्या ट्रेनी अप्रेटिंस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Kokan Railway Jobs
Kokan Railway JobsSaam Tv
Published On
Summary

कोकण रेल्वेत नोकरीची संधी

ट्रेनी अप्रेंटिसा पदासाठी भरती

पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोकण रेल्वेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण १९० रिक्त जागा आहेत. त्यामुळे रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही रेल्वेच्या konkanrailway.com वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

Kokan Railway Jobs
Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

कोकण रेल्वेतील या नोकरीसाठी भरतीप्रक्रिया २७ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पात्रता (Eligibility)

कोकण रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करायचे आहे. इंजिनियरिंग डिग्री, डिप्लोमा केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Kokan Railway Jobs
Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगार ₹८५०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये फी भरायची आहे. सिविल इंजिनियरसाठी ३० जागा रिक्त आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसाठी २० तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगसाठी १० जागा रिक्त आहेत. मेकॅनिकल इंजिनियरिंगसाठी २० जागा रिक्त आहेत.उर्वरित जागा या डिप्लोमाधारकांसाठी आहे. त्यामुळे पात्रतेनुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे.

Kokan Railway Jobs
Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com