Government Job Google
naukri-job-news

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

Railtel Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंंदाची बातमी आहे. रेलटेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची चांगली संधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा सरकारी नोकरी म्हटल्यावर आपल्याला परीक्षा द्यावी लागणार तरच नोकरी मिळणार, असे वाटते. परंतु अनेक सरकारी कंपन्यामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. अनेक विभागात भरती असते. सरकारी कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेलटेल कॉर्पोरेश ऑफ लिमिटेडने अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवार NATS (National Apprentice training system) च्या अधिकृत वेबसाइट nats.education.gov.in वर क्लिक करा.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ४० रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इंजिनियरिंग/ टेक्नोलॉजी मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित शाखेत ६० पेक्षा जास्त गुण प्रा्त केलेले असावे. १८ ते २७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीत शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर फिटनेस परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतरच अंतिम निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी ग्रॅज्युएट इंजिनियर पदासाठी १४,००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.डिप्लोमा इंजिनियर पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT