Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. रेल्वेत सध्या अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
Railway Recruitment
Railway RecruitmentCanva
Published On

रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी अर्जप्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२४ आहे.

नॉर्थ वेस्टर्न रेल्वे अप्रेंटिसशिप पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. उमेदवारांनी rractapp.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

रेल्वेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून १० आणि १२ वी पास केलेले असावे. त्याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये ITI,NCVT/SCVT उत्तीर्ण केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Railway Recruitment
Jobs: नोकरी अन् रोजगाराच्या सर्वाधिक संधी बंगळुरुमध्ये, मुंबई कितव्या स्थानी,नोकरदारांना सरासरी किती वेतन?

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी rrcactapp.in या साइटवर क्लिक करा.

त्यानंतर वेबसाइटच्या मुख्य पेजवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.

रजिस्ट्रेशननंतर लॉग इन करुन सर्व माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.

यानंतर अर्ज फी जमा करा.यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.

शुल्क

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी १०० रुपये भरायचे आहेत.तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाहीत.

Railway Recruitment
Government Job: सरकारी नोकरी अन् १ लाख ८० हजार रुपये पगार; GAIL India मध्ये सुरु आहे भरती; पात्रता काय? जाणून घ्या

ओएनजीसी भरती

सध्या ओएनजीसीमध्येही अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २२३६ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामधील १५९ पदे ही महाराष्ट्रातील आहेत. या पदासाठी १०वी, १२वी आणि आयटीआय पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

Railway Recruitment
Government Job Rule : सरकारी नोकर भरतीचे नियम मधेच बदलता येणार नाहीत; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com