Jobs: नोकरी अन् रोजगाराच्या सर्वाधिक संधी बंगळुरुमध्ये, मुंबई कितव्या स्थानी,नोकरदारांना सरासरी किती वेतन?

Highest Job Opportunity In India: देशात सर्वाधिक रोजगाराची संधी ही बंगळुरु येथे आहे. बंगळुरमध्ये सर्वाधिक लोक काम करतात आणि त्यांच्या वेतनातदेखील जास्त वाढ होते.
Jobs
JobsSaam Tv
Published On

नोकऱ्यांच्या बाबतीत बंगळुर आजही रोजगार संधी आणि वेतन वाढ देणारे भारताचे सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. येथे मागील वर्षाच्या तुलनेत ९.३% वृद्धी निदर्शनास आली असून ही वाढ टेक्नॉलॉजी आणि व्यवसायाचे केंद्र म्हणून बंगळुरुची जुनी ख्याती अधोरेखित करते. बंगळूरमधील सरासरी मासिक वेतन २९,५०० रुपये आहे.

ही बाब भारताचा आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून निदर्शनास आली आहे. या अहवालाने हंगामी आणि स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली आहे.

Jobs
Government Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; या कंपनीत सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे ७.५% आणि ७.३% इतकी मजबूत पगार वाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते. चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन २४,५०० रुपये असून दिल्लीत ते २७,८०० रुपये इतके आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे देखील स्थिर वेतनवाढ दिसून आली ज्यामधून प्रमुख रोजगार केंद्रे म्हणून त्यांचे महत्व पक्के होते. मुंबईतील सरासरी वेतन २५,१०० रुपये आहे तर पुण्याचे सरासरी वेतन २४,७०० रुपये असून त्यांनी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळली आहे.

या शहरांमध्ये वेतनवाढ ४% ते १०% या श्रेणीत आहे. उद्योग आघाडीवर ८.४% वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्यूरेबल्स (५.२%) आणि बँकिंग आणि इतर सेवांमध्येही (५.१%) दिसून येतो तसेच या दोन्हींत व्यावसायिकांसाठी वृद्धीच्या दमदार संधी दिसत आहेत. दुसरीकडे, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम आणि रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली आहे, जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते. (Jobs In India)

Jobs
Government Job: सरकारी नोकरीची संधी; MSF मध्ये विविध पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

सर्वाधिक वेतन देणाऱ्या उद्योगांमध्ये टेलिकम्युनिकेशन्स (२९,२०० रुपये), उत्पादन, इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२८,२०० रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (२७,६०० रुपये) आणि बांधकाम आणि रियल इस्टेट (२७,००० रुपये) यांचा समावेश आहे.कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि बांधकाम व रियल इस्टेट सारख्या क्षेत्रांमध्ये स्थायी आणि हंगामी नोकऱ्यांमधील वेतनातील अंतर कमी होणे दर्शविते की, कंपन्या प्रतिभेच्या समानतेवर आणि कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ धरून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. हे कल भारतात कामाच्या भविष्याला आकार देण्यात अनुकूलता आणि कौशल्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करत आहेत.” हा अहवाल गेल्या पाच वर्षात नियमित वेतन वाढ देणाऱ्या काही विशिष्ट नोकऱ्यांवर देखील प्रकाश टाकतो.

Jobs
Government Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; या कंपनीत सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

एफएमसीजी उद्योगात सर्वाधिक वृद्धी दिसते, ज्यात ट्रेनी असोसिएट आणि पायलट ऑफिसर या नोकऱ्यांसाठी अनुक्रमे ९.५% आणि ८% इतका जोरदार सीएजीआर आहे. त्याच्या पाठोपाठ बँकिंग आणि इतर उद्योगात एचआर एक्झिक्युटिव्ह्ज (७.९% सीएजीआर) आणि सेल्स मॅनेजर (६.६% सीएजीआर) यांना लक्षणीय दीर्घकालीन वृद्धी मिळालेली दिसते. शहरांचा विचार केल्यास, हैदराबाद येथे ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (८.१% सीएजीआर), अहमदाबादेत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह्ज (७.८% सीएजीआर), पुण्यात सेल्स मॅनेजर (६.८% सीएजीआर) आणि दिल्लीत डेटा कोऑर्डिनेटर (६.६% सीएजीआर) या विशिष्ट रोल्समध्ये चांगली वृद्धी दिसते आणि त्यातून उद्योग आणि शहरांत कुशल व्यावसायिकांची व्यापक मागणी प्रतिबिंबित होते.

भारताचे रोजगार मार्केट सतत बदलत आहे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’ बँकिंग आणि अन्य, कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि एफएमसीजीसारख्या क्षेत्रांत विशिष्ट कौशल्यांची लवचिक मागणी, वेगवेगळ्या नोकऱ्यांमधील गतिशील वेतन वाढ आणि व्यावसायिकांसाठी अधिक उज्ज्वल भविष्य दर्शवितो.

Jobs
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ग्रुप बी आणि सी पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com