लहान भावाची प्रचार सभा रितेश देशमुख यांनी गाजवली. धीरज देशमुख यांचं एक नंबरला बटन आहे त्यामुळे ते आमदार तर होणारच आहेत, पण विरोधक देखील आमदार आहेत. त्यामुळे त्यांना या बटणाची गरजच नाही आणि यावेळेस एवढ्या जोरात बटण दाबा की, पुढच्या वेळेसच विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि लोकसभेला जे वारं होतं आता विधानसभेला झापुक-झूपूक झालं पाहिजे असं म्हणत भाजपाचे ग्रामीणचे उमेदवार तथा विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांच्यावर नाव न घेता अभिनेता रितेश देशमुख याने निशाणा साधला आहे. रितेश देशमुख लहान भावाच्या लातूर येथील प्रचार सभेत बोलत होता.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराला त्याचे ज्येष्ठ बंधू आणि सिनेस्टार रितेश देशमुख सुद्धा त्यांच्याकरिता मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी त्याचे बंधू रितेश देशमुखने देखील हजेरी लावली. ते या सभेत बोलताना म्हणाले, कालच्या महिल्या मेळाव्यातच विजय निश्चित झाला होता आणि आजची सभा ही फक्त लीड आहे. लोकांसारखे आपल्याला पण काम करायचे आहे, विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावे म्हणून येतात. गेल्या पाच वर्षांपासून धीरजने प्रामाणिकपणे काम केलं आहे. यावेळी लातूर पॅर्टनला आपले युवक शिक्षण घेत आहेत. पण रोजगार आहे का तुमच्या हातात. हा रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पिका पाण्याला भाव आहे का? रोजगार द्यायची जिम्मेदारी कुणाची आहे? अभिनेते रितेश देशमुख असे म्हणत सरकारला सवाल केला आहे.
लोकसभेला जे वारं होतं आता विधानसभेला झापुक झुपुक झालं पाहिजे. आता समोर गुलिगत धोका आहे. त्या धोक्याला तुम्ही बळी पडू नका. आपले उमेदवार चांगले आहेत. ते तुमच्यासाठी काम करतात. यावेळेस एवढ्या जोरात बटण दाबा की, पुढच्या वेळेसच विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. सरकार हे महाविकास आघाडीचे येणार आहे. तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचाच पंजा लय भारी, असं त्यांच्याच चित्रपटातील संवाद म्हणत त्यांनी त्यांच्या भाषणाची सांगता केली.
Written By: Dhanshri Shintre.