Pharma Plant Blast : ३०० कर्मचारी जेवत होते, त्याचवेळी फार्मा प्लांटमध्ये ब्लास्ट, १७ जणांचा मृत्यू, ५० जखमी!

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली येथील एका फार्मा प्लांटमध्ये रिएक्टर ब्लास्टमध्ये १७ जणांचा मृत्यू झालाय. ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
Pharma Plant Blast
Pharma Plant Blastसोशल मीडिया
Published On

Andhra Pradesh Latest News : आंध्र प्रदेशमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. अनकापल्ली येथील एका फार्मा प्लांटमध्ये दुपारी रिएक्टर ब्लास्ट झाला. या दुर्देवी घटनेत १७ जणांचा मृत्यू झालाय तर ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी ब्लास्ट झाला त्यावेळी ३०० कर्मचारी जेवण करत होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,अनकापल्ली येथील अच्युतपुरम एसईजेड येथील फार्मा प्लांटमध्ये रिएक्टरमध्ये ब्लास्ट झाला. दुपारी कर्मचारी जेवण करत होते, त्यावेळी अचानक हा स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा जीव गेलाय. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमीवर उपचार सुरु आहेत. या घटनेतील मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

फार्मा प्लांटमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर बचावपथक आणि अग्निशामन दल तातडीने दाखल झाले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. जिल्हा एसपी दीपिका पाटील यांनी बुधवारी रात्री या घटनेबाबत एएनआय वृत्तसंस्थेला अधिकृत माहिती दिली. 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार काही मृतांची ओळख पटली आहे.फार्मा प्लांटमध्ये झालेला स्फोट इतका शक्तिशाली आणि विध्वंसक होता की केमिकल जळल्यामुळे अपघातातील मृतांची त्वचा खराब झाली होती. तेथील दृश्य हे भयंकर, हृदयद्रावक होते. अनेकजण किंचाळत होते, असे अच्युतपुरम पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर एम बुचैया यांनी माध्यमांना सांगितले.

दुपारच्या जेवणावेळी दुर्घटना घडली -

रिएक्टर स्फोट झाल्याची माहिती इतर लोकांना समजली. त्यावेळी अनेकजणांना याबाबात अधीच भाष्य केले होते. या औषध कंपनीत मोठी दुर्घटना होऊ शकते. याचा अंदाज होता, असे अनेकांनी सांगितले. आज दुपारी कंपनीतील कर्मचारी जेवण करत होते, बहुतांश कामगार बाहेर जेवायला गेले होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मृताची संख्या आणखी वाढली असती, अशी माहिती देण्यात आली.

आंध्र प्रदेशातील कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केले. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी उपस्थित आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com