Oil India Jobs Saam Tv
naukri-job-news

Oil India Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Siddhi Hande

ऑइल इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.ऑइल इंडिया सारख्या मोठ्या कंपनीत तरुणांसाठी नोकरी करण्याची संधी आहे. ऑइल इंडिया कंपनीत ४० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये लेखी परीक्षा नाबी तर वॉक इन प्रॅक्टिकल किंवा स्किल टेस्टच्याआधारे केली जाणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही चांगली संधी आहे. (Oil India Jobs)

ऑइल इंडियामध्ये इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक (एसी आणि आर), असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) पदांसाठी ४० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. २१ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इलेक्ट्रिशियन पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. मेकॅनिकसाठी २ जागा रिक्त आहेत. असोसिएट इंजिनियरसाठी २० रिक्त जागा आहेत.या नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी निवड वॉक इन प्रॅक्टिकल/स्किल टेस्टद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. या नोकरीसाठी वैयक्तिक मूल्यांकनाद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (Oil India Recruitment)

रेल्वे भरती (Railway Bharti)

सध्या रेल्वेतदेखील भरती सुरु आहे. टेक्निशियन पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १४००० पेक्षा अधिक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी याआधीही अर्जप्रक्रिया सुरु होती. मात्र, आता पदांची संख्या वाढवून १४००० करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

आयटम साँगमुळे लहान मुलं भरकटतायत; वेळीच मुलांच्या अशा कृत्याकडे लक्ष द्या...!

लेकीच्या जन्मानंतर ५०,००० मिळणार; १८ वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला जमा होणार पैसे; Majhi Kanya Bhagyashree Yojana चा लाभ कसा घ्यायचा?

Harshvardhan Patil: इंदापूरमधून आमदारकीचं तिकिट कुणाला? शरद पवारांसमोरच हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...

Rashami Desai: रश्मी देसाईचा नवरात्री स्पेशल लूक, सौंदर्य खूपच भारी

SCROLL FOR NEXT