Daund Hadapsar Demu Train : डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार, हजारो रेल्वे प्रवाशांना दिलासा

Pune Demu Train : दौंड ते हडपसरपर्यंत धावणारी डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार आहे. त्यामुळे दौंड ते पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Daund Hadapsar Demu Train
Daund Hadapsar Demu TrainSaam Digital
Published On

दौंड ते पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. दौंड ते हडपसरपर्यंत धावणारी डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार आहे. डेमू ट्रेन हडपसरपर्यंतच धावत असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. डेमू ट्रेन हडपसर ऐवजी पुणे स्टेशनपर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. अखेर रेल्वेने प्रवाशांची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे दौंड - हडपसर ही डेमू ट्रेन आता पुणे रेल्वे स्थानकापंर्यत धावणार आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

दौंड स्थानकावरून सकाळी ६:१० वाजता सुटणारी ०१५२२ डिझेल (DMU LOCAL) रेल्वे हडपसर (मुंढवा) पर्यंतच असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते, हि डेमू हडपसर ऐवजी पुणे स्टेशन पर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. आता ०१५२२ रेल्वे ही गाडी दौंड स्टेशन वरून सकाळी ६:०५ वाजता सुटेल.

याबाबत  रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेच्या दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी दौंड रेल्वे स्टेशन येथे भेट दिली त्यावेळी केली होती, तसेच आपण याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. ०१५२२ - दौंड - हडपसर डेमू पुण्यापर्यंत नेण्याची मागणी केली होती.

Daund Hadapsar Demu Train
Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ, हिंडेनबर्गच्या आरोपांची होणार चौकशी

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेकडे दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे दौंड पुणे रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने तसेच प्रवाशांच्यावतीने आभार मानतो. तसेच दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देखील  रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव, तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे आभार.

Daund Hadapsar Demu Train
Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com