Government Jobs: Saam Tv
naukri-job-news

Government Jobs: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी कामाची बातमी, NIACL कंपनीत ३२५ पदांसाठी भरती; जाणून घ्या

NIACL Recruitment 2024: न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. कंपनीत ३२५ जागांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

NIACL Company Recruitment for 325 Posts: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NAICL)मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया २१ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे.

NAICL ही भारत सरकारची कंपनी आहे. त्यामुळे सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२४ असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट www.newindia.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

ज्या तरुणांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे. त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी देशभरातली उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गासाठी १९० जागा राखीव आहेत.ओबीसी प्रवर्गासाठी ६२ जागा राखीव आहेत. एकूण ३२५ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

NAICL मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाले असावे. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना तुम्ही वेबसाइटवर पाहू शकतात.

अप्रेंटिसशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग कालावधीत ९००० रुपयांची स्टायपेंड दिली जाईल. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि प्रादेशिक भाषा परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे. ही परीक्षा १२ ऑक्टोबर २०२४ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT