बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेत नोकरीची उत्तम संधी आहे. अनेकजण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात. जर तुमचेही शिक्षण पूर्ण झाले असेल अन् तुम्हाला नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
पंजाब अँड सिंध बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. बँकेत २१३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Bank Jobs)
पंजाब अँड सिंध बँकेत नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती. ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. याबाबत माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या भरतीमध्ये आयटी ऑफिसर, ह्युमन रिसोर्स मॅनेजर, अकाउंट मॅनेजर पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेली असावी.कामाचा अनुभव असलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात येईल.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेनंतर केली जाणार आहे. लेखी परिक्षेनंतर उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. (Punjab And Sind Bank Recruitment)
या नोकरीसाठी जर तुमची निवड झाली तर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. जेएमजीएस I पदासाठी ४८ हजार ते ८५ हजार रुपये पगार मिळणार आहे. तर जीएमजीएस IV पदासाठी १ लाख २० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी punjabandsindbank.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.