Health Department Job Saam Tv
naukri-job-news

NHM Bharti: आरोग्य विभागात नोकरीची संधी; १९४७ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Aarogya Vibhag Bharti 2025: आरोग्य विभागाअंतर्गत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सध्या भरती केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी

राष्ट्रीय आरोग्य अभियनाअंतर्गत होणार भरती

१९४७ पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.१९७४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. (Aarogya Vibhag Bharti)

आरोग्य विभागातील (Health Department) या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे. समुदाय आरोग्य अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

या नोकरीसाठी बीएएमएस, बीयुएमएस,बीएससी नर्सिंग, बीएससी इन कम्युनिटी हेल्थ पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी मेडिकल विषयातील पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. https://nhm.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. याच वेबसाइटवर तुम्हाला नोकरीबाबत सर्व माहिती मिळणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

आरोग्य विभागातील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : गुडघ्यांच दुखणं थांबवण्याचा रामबाण उपाय, वापरा हे घरगुती तेल

Palghar: बाळंतीण महिलेला रुग्णवाहिकेनं अर्ध्या रस्त्यात सोडलं, बाळाला घेऊन २ किमीपर्यंत पायपीट; पालघरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update : निवडणूक आरक्षणावर पुढील सुनावणी शुक्रवारी

Supreme Court : निवडणूक आरक्षणावर कोर्टात काय झालं? सर्वोच्च न्यायालयाने सरकार अन् आयोगाला झापलं

Cancer Symptoms: आळशीपणामुळे वाढेल कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली सुरुवातीची लक्षणे

SCROLL FOR NEXT