Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Riya Saini: आयएएस रिया सैनी यांनी रेल्वेत नोकरी करत असताना यूपीएससी परीक्षा दिली. रिया सैनी या तिसऱ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी झाल्या. पहिल्या प्रयत्नात त्यांची रेल्वेत निवड झाली होती.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IAS रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

UPSC च्या तिसऱ्या प्रयत्नात झाल्या IAS

रेल्वेत नोकरी करत केला यूपीएससीचा अभ्यास

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासात सातत्य ठेवावे लागते. जर तुम्ही सातत्य ठेवले नाही तर तुम्हाला यश मिळत नाही. स्पर्धा परीक्षा देताना नेहमी एका गोष्टीवर फोकस करायचा असतो. दरम्यान, अनेक अधिकारी आहेत ज्यांनी नोकरी करता करता यूपीएससी परीक्षा दिली आणि त्यांना यशदेखील मिळाले. असंच एक उदाहरण म्हणजे रिया सैनी.

Success Story
MPSC Success Story: सलग १६ वेळा अपयश, शेवटी जिद्दीने क्रॅक केली MPSC; झाडू कामगार महिलेची लेक झाली क्लास १ अधिकारी

IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले

रिया सैनी यांनी आपले आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. रिया या मूळच्या उत्तर प्रदेशमधील मुझफ्फपुर जिल्ह्यातल टाडा या गावच्या रहिवासी. त्यांनी यूपीएससी २०२४ परीक्षेत २२ वी रँक प्राप्त केली. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी पीक्षा दिली.

यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी निवड भारतीय रेल्वे ट्राफिक सर्व्हिस (IRTS) मध्ये झाली. त्यांची लखनऊ येथे पोस्टिंग झाली होती. मात्र, त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि शेवटी २०२४ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

रिया सैनी यांचे वडील मिलिट्री इंजिनियरिंग सर्व्हिसमध्ये मुख्य इंजिनियर पदावर कार्यरत आहे. आई गृहिणी आहेत. तर भाऊ अनमोल राष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळतो.

Success Story
Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

रिया यांनी बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर यूपीएससी परीक्षेवर फोकस केला. त्यांनी रोज सात-आठ तास अभ्यास केला. हेच त्यांच्या यशामागचे कारण आहे. रिया यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे. रियाच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला.

Success Story
Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ९ तरुणांची एकाचवेळी सैन्य दलात निवड; गावकऱ्यांनी केला जल्लोष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com