Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ९ तरुणांची एकाचवेळी सैन्य दलात निवड; गावकऱ्यांनी केला जल्लोष

Madha 9 Boys Selected In Indian Army: माढ्यातील ९ तरुणांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. या तरुणांनी दिवसरात्र मेहनत करुन हे यश मिळवलं आहे. या तरुणांचा गावकऱ्यांना खूप अभिमान वाटत आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

माढ्यातील ९ तरुणांची सैन्य दलात निवड

दिवसरात्र एक करुन केली होती मेहनत

शिवराज भांगे, पांडुरंग मुसळे,अमरजीत कदम,संस्कार माळी यांची निवड

भैरवनाथ जाधव आणि ओंकार उबाळे यांची अग्नीवीर भरतीत निवड

सैन्यात जाण्याचे, देशासाठी काहीतरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. यासाठी अनेकजण जीव तोडून मेहनत करतात. सैन्यातील भरतीसाठी दिवसरात्र सराव, अभ्यास करतात. असाच सराव माढ्यातील सहा तरुणांनी केला आणि त्यांची निवड भारतीय सैन्य दलात झाली आहे. माढ्यातील ९ तरुणांची सैन्यात अग्नीवीर भरतीत निवड झाली आहे.

Success Story
Success Story: जिद्द! पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; २२ व्या वर्षी IAS अधिकारी, मोनिका यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

भारतीय सैन्य दलातील अग्नीवीर भरती प्रक्रियेत माढा तालुक्यातील सहा युवकांनी घवघवीत यश मिळवले आहे. देशसेवेची ओढ आणि कठोर तयारीच्या जोरावर या युवकांनी सैन्य दलात प्रवेश मिळवला आहे. त्यांचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे.

निवड झालेल्यांमध्ये शिवराज भांगे (माढा), पांडुरंग मुसळे (केवड), अमरजीत कदम (विठ्ठलवाडी), संस्कार माळी (उपळाई बुद्रूक), भैरवनाथ जाधव (भोगेवाडी) आणि ओंकार उबाळे (दारफळ) या तरुणांचा समावेश आहे.

तरुणांच्या या यशाबद्दल कौतुक व्यक्त करण्यात आले आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी निवड झालेल्या सर्व जवानांचा विठ्ठल मूर्ती भेट देऊन सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांना यशोदीप करिअर अकॅडमी माढा चे कृष्णा राऊत यांचे मार्गदर्शन लाभले होते. नियमित प्रशिक्षण, शिस्तबद्ध व्यायाम व अभ्यासामुळे हे यश शक्य झाल्याचे राऊत त्यांनी सांगितले.

Success Story
Success Story: तीन वेळा अपयश आलं तरी जिद्द सोडली नाही; IAS झाली; अवधिजा गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास

म्हैसगावातील ३ जणांची सैन्य दलात निवड

माढा तालुक्यातील म्हैसगाव गावातील अभिजित बाबा निंबाळकर, शंभुराजे शिवाजी खारे, यशराज ज्ञानेश्वर जगताप या तीन तरुणांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. एकाचवेळी तीन जणांची सैन्य दलात निवड झाल्यानंतर गावात एकच जल्लोष झाला. गावकऱ्यांकडून तिघांचा जाहीर सत्कार केला. मित्रांकडून तिघांचेही अभिनंदन करण्यात आली.यामुळे गावातील इतर तरूणांमध्ये उत्साह संचारला असून सैन्य दल आणि पोलीस भरतीच्या तयारी जोरात केली जात आहे.

Success Story
Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com