तपास फंडाची बिले प्रलंबित असल्याचा आरोप वाढला
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याची चर्चा
105 कर्मचाऱ्यांच्या सत्कारात फक्त 30 बुके दिल्याने वाद
प्रशासनाकडून उत्तरांची मागणी
सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राखणार्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकार्यांसह कर्मचार्यांना पदरमोड करून पोलीस ठाण्यांचा खर्च भागवावा लागत आहे. मात्र, तरीही खिशातून घातलेले पैसे पुन्हा मिळविण्यासाठी आमची तपास फंडाची बीले मंजूर करा, अशी भीक विभागीय प्रशासनाकडे मागण्याची वेळ आल्याचं म्हटलं जात होत. संबंधितांकडून मात्र हात वर करीत तपास फंडाला निधीच उपलब्ध नसल्याचे कारण देत वेळ मारून नेली जात आहे, असा दावा करण्यात आला.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणतात फंडाची कमी नाही, मात्र वर्षानुवर्षे अनेक पोलीस अमलदारांसह अधिकाऱ्यांची थकलेली बिले काढण्यात वेळ का लागत आहे. तोच निधी सरकारने लाडकी बहीण योजनेकडे वळवला असल्याचे बोलले जात आहे. मात्र छातीठोकपणे सांगणारे पुणे पोलीस आयुक्त प्रलंबित तपास फंड बाबत बोलणार कधी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, कोणत्याही गोष्टीची वेळ मारून नेणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथक अधिकाऱ्यांच्या बिलाला खोडा घातला आहे. ही बिले मंजूर झाली तरच आपल्या अधिकाऱ्यांना पोलिसांकडे पैसे कमी नसल्याचा अनुभव येणार आहे, अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे.
या कारवाईचा गाजावाजा पोलिसांनी केला असला तरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईसाठी आम्हाला शासन मोठी मदत करत असतं आणि या मदतीतूनच 105 कर्मचारी आम्ही पाठवले होते. कुणाच्या मदतीची आम्हाला गरज नाही असं पत्रकार परिषदेत सांगितलं. एवढी मोठी कामगिरी करणाऱ्या 105 कर्मचाऱ्यांना फक्त पोलीस आयुक्तांनी 30 बुके आणले होते. 30 बुके आणि 105 कर्मचारी एवढी कंजूसी पोलीस आयुक्तांनी कामगिरी केल्यानंतरही दाखवली.
बुकेची किंमत पाहिली तर दीडशे ते दोनशे रुपये असू शकते. जर शासन फंड देतो पोलीस खात्याला आर्थिक मदत करतं कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवावर बेतून एवढी मोठी कामगिरी केली. मात्र पोलीस आयुक्तांनी त्यांचा सत्कार करण्यात कंजूशी का दाखवली अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 105 कर्मचाऱ्यांना एक गुलाबाचे फुल दिला असतं तरीही ते त्यात खुश झाले असते. मात्र आम्हीच कसे बरोबर आम्हाला पैशाची कमी नाही असं सांगणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र बुके देण्यात व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात हात आखडता घेतला. गेली एक ते दीड वर्ष पोलीस तपासासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांची बील वेळेत दिली जात नाहीत. जर पोलीस खात्याकडे पैसे नसतील तर 105 कर्मचारी पाठवून एवढा गाजा वाजा पुणे पोलिसांनी का केला.
जीवावर उदार होऊन १०५ पोलीस अधिकारी व अमलदारांनी मध्य प्रदेशात जाऊन उमरटी ऑपरेशन राबविले. त्यांचा सन्मान करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात कौतुक सोहळा पार पडला. मात्र, पोलीस मुख्यालय उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांचा कंजूसपणा दिसून आला आहे. त्यांनी फक्त ३० छोट्या बुकेची ऑर्डर दिली होती. त्यामुळे स्टेजवर सत्कार झाला की पोलीस अमलदारांसह अधिकारी यांच्या हातातील बुके काही अंतरावर काढून घेण्यात आले. पुनः तेच बुके पोलीस आयुक्त यांच्या हाती देऊन इतरांचा सन्मान करण्यात आला. काय तर म्हणे पोलिसांकडे पैशाची कमी नाही, मग एवढा कंजूसपणा का केला, अशी विचारणा काही अमलदारांनी केली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.