

मोनिका यादव यांचा प्रेरणादायी प्रवास
पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाल्या प्रशासकीय अधिकारी
जर तुम्ही सतत प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. प्रामाणिकपणा आणि सातत्याच्या जोरावर तुम्ही कोणतेही यश मिळवू शकतात. वाटेत कितीही अडथळे आले ती त्यावर मात करु शकतात. असंच काहीसं मोनिका यादव यांनी केलं. त्यांनी वयाच्या केवळ २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्या प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
वडील RAS अधिकारी
मोनिका यांचे वडील हरफूल सिंह यादव हे आरएएस अधिकारी आहेत. त्यांच्यामुळेच त्यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांना नेहमीच नागरी सेवा परीक्षा देण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. अवघ्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी ४०३ रँक प्राप्त केली. आयएएस झाल्यानंतरही त्यांनी राजस्थान नागरी सेवा परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना ९३ रँक मिळाली.
मोनिका यांनी नेट, जेआरएफ आणि सीए या सर्वात कठीण परीक्षादेखील पास केल्या. त्या लखनऊ येथे इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ट्रेनिंग घेत असताना त्यांना सर्वोकृष्ट कामगिरीचा पुरस्कारही मिळाला.
आयएएस अधिकारी असूनही मोनिका या नेहमी लोकांच्या संपर्कात असतात. त्या सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे पोस्ट करत असतात. त्यांचे वडील आरएएस अधिकारी तर आई गृहिणी आहेत. मोनिका यादव यांचे पतीदेखील आयएएस अधिकारी आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी पास करणाऱ्या सर्वात तरुण अधिकाऱ्यांपैकी मोनिका एक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.