

IPS सुरज सिंह परिहार यांचा प्रवास
८ बँकांच्या परीक्षा केल्या क्रॅक
दोनदा केली यूपीएससी क्रॅक
यूपीएससी पास करणे हे खूप अवघड आहे. यूपीएससी परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही फक्त काही दिवस अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. असंच काहीसं सुरज सिंह परिहार यांच्यासोबत झालं. कॉल सेंटरपासून सुरु केलेला हा प्रवास त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आहे. त्यांच्यामुळे अनेक तरुणांना पाठबळ मिळालं आहे.
सूरज सिंह परिहार हे उत्तर प्रदेशचे रहिवासी. ते पाचवीपर्यंत आपल्या आजी-आजोबांसोबत रोहत होते. त्यांनी उत्तर प्रदेशमधील जौनपुर या गावात शिक्षण घेतले. पाचवीनंतर आपल्या आईवडिलांकडे म्हणजे कानपुर येथे ते गेले. तिथे त्यांनी हिंदी मीडियम शाळेतून शिक्षण घेतले.
सुरज सिंह हे लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी १२वीत यूपी बोर्डात टॉप केले होते. ते जॉइंट फॅमिलीत राहत होते. त्यांच्या घरात त्यांचे वडील एकटेच कमवत होते. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती. त्यांनी कॉलेजमध्ये असताना मित्रासोबत इंग्रजीचे कोचिंग क्लासेस सुरु केली. त्यांनी पैसे कमवण्यास सुरुवात केली.
यानंतर त्यांनी कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. परंतु त्यांना काही महिन्यातच नोकरी सोडण्यास सांगितले. तेव्हा त्यांना एका महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. या काळात त्यांनी खूप मेहनत घेतली आणि आपले काम सुरु ठेवले. परंतु त्यांना यूपीएससी परीक्षा द्यायची होती.
सुरज सिंह परिहार हे २००७-२००८ मध्ये दिल्लीत यूपीएससीचे क्लासेससाठी गेले. यानंतर त्यांनी बँकेच्या परीक्षा दिल्या. त्यांनी आठ बँकांच्या परीक्षा दिल्या.त्यानंतर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम केले. त्यांना मॅनेजन म्हणून प्रमोशनदेखील मिळाले. परंतु त्यांचे स्वप्न वेगळे होते.
सुरज सिंह परिहार यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. यासाठी त्यांनी बँकेतील नोकरीदेखील सोडली. त्यांनी एसएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक २३ प्राप्त केली. यानंतर त्यांनी २०११ मध्ये यूपीएससी दिली परंतु इंटरव्ह्यू क्लिअर करु शकले नाही. त्यानंतर २०१२ मध्येही त्यांना अपयश मिळाले. त्यांनी २०१३ मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यानंतर ते आयआरएस म्हणून सिलेक्ट झाले. यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांनी १९८ रँक प्राप्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.