Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

pipeline alcohol delivery : आता पाईपलाईनने दारू घरी मिळणार आहे...हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल...पण, असा दावा करण्यात आलाय...केंद्र सरकारकडूनच परवानगी मिळते असा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
alcohol pipeline fact check
pipeline alcohol deliverySaam tv
Published On

आता दारू तुमच्या घरीच येणार ती म्हणजे पाईपलाईनने...केंद्र सरकारच आता घरापर्यंत पाईपलाईनने दारू देणार आहे...त्यासाठी अर्ज करावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...हर घर नल या योजनेप्रमाणेच ही दारूची योजना असल्याचा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलंय...हा मेसेज केंद्र सरकारच्या नावाने व्हायरल होत असल्याने अनेकांना यावर विश्वास बसू लागलाय...पण, खरंच अशी केंद्राची कोणती योजना आहे का...? या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात..

व्हायरल मेसेज काय?

मेसेजमध्ये म्हटलं आहे की, केंद्र सरकार घरांपर्यंत दारूची पाईपलाईन टाकणार आहे. कनेक्शनसाठी अर्ज नियम आणि कायदे देखील देण्यात आले. इच्छुकाने अर्ज भरून 11 हजारांच्या डिमांड ड्राफ्टसह पंतप्रधान कार्यालयात सादर करावा'.

alcohol pipeline fact check
Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला

या मेसेजसोबत आणखी काही माहिती देण्यात आलीय...अर्जदाराचे नाव, पत्ता आणि फोटो देखील मागवण्यात आलाय...आणि हे कनेक्शन जोडल्यानंतर महिन्याचं बिल तुमच्या घरी येईल असा दावा केलाय...पण, सरकारच्या नावाने हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना खरं वाटू लागलंय...काहींनी याबाबत मेसेज करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाय...दारू पिणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही...मग सरकारची अशी खरंच योजना आहे का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

साम इन्व्हिस्टिगेशन

घरी पाईपलाईनने दारू येण्याची योजना नाही

केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही

पाईपलाईनने दारू घरी येणार असल्याचा मेसेज खोटा

alcohol pipeline fact check
ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका? VIDEO

दारू प्या असं कोणतंही सरकार सांगत नाही...आणि दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झालेयत...त्यामुळे आता मद्यपींसाठी दारूची पाईपलाईन कनेक्शन मिळणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...असे मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com