NHAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

NHAI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती; पगार १.७७ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

NHAI Recruitment 2026: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

NHAI मध्ये नोकरीची संधी

डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती

मिळणार १.७७ लाख रुपये पगार

सरकारी नोकरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. सरकारी नोकरीसाठी अनेकजण परीक्षेची तयारी करतात. अनेकजण परीक्षा पास करतात तर अनेकांना परीक्षेत यश मिळते. परंतु अनेकांना यश मिळत नाही. दरम्यान, आता तुम्हाला परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भरती जाहीर केली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. टेक्निकल विभागात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही nhai.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२६ आहे. त्यामुळे तोपर्यंत अर्ज करा.

पगार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात एकूण ४० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ९ जानेवारीपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी १ महिन्याचा कालावधी आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना लेव्हल १० नुसार ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० पेक्षा जास्त नसावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड GATE २०२५ च्या गुणांच्या आधारित होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये.

शैक्षणिक पात्रता

एनएचएआयमध्ये (NHAI) नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. त्यांच्याकडे गेटचे स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT