सध्या तरुणाई ही सर्वात जास्त नोकरीच्या शोधात आहे. सध्या रोजगाराच्या संधी झपाट्याने बदलताना दिसत आहे. एकीकडे नोकरीच्या शोधात असणारी तरुणाई खूप जास्त आहे त्या तुलनेत नोकरीच्या संधी खूप कमी आहेत. त्यामुळे नोकरी शोधताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सामान्यत अनेक लोक गुगलवर किंवा अनेक वेबसाइटवर नोकरी शोधतात. नोकरी शोधताना आणि नोकरीसाठी अर्ज करताना नेहमी तुम्हाला काही गोष्टी अपडेट करायच्या आहेत.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुगलवर नोकरी शोधताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत.
नोकरी शोधण्यासाठी योग्य वेबसाइट (Job Search Websites)
सर्वप्रथम नोकरी शोधण्यासाठी तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म निवडता हे महत्त्वाचे आहे.तुम्ही Google Jobs, Linkdln,Naukari.com, Indeed हे जॉब पोर्टल वापरुन शकतात. येथे तुम्हाला स्वतः चे अकाउंट तयार करायचे आहे.
तुमचे प्रोफाइल अपडेट करा (profile Update)
नोकरी शोधताना नेहमी तुमचे प्रोफाइल अचूक आणि अपडेट असायला हवे. तुमच्या रिझ्युमेमध्ये तुमचे कौशल्य, शिक्षण आणि अनुभव लिहलेले असावे. त्याचसोबत तुमचा फोटो आणि बायो असणे गरजेचे आहे.
नेटवर्किंग
नोकरी शोधण्यासाठी नेटवर्क असणे हे खूप गरजेचे आहे. तुम्ही प्रोफेशनल लोकांची चांगले कनेक्शन तयार करु शकतात. यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टींबद्दल माहिती मिळेल. तसेच नोकरीच्या संधीबाबत अपडेट मिळत जाईल.
जॉब सर्चसाठी किवर्ड्स वापरा (Keywords)
तुम्ही नोकरी शोधण्यासाठी योग्य किवर्ड वापरा. योग्य किवर्ड वापरल्याने तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी लगेच मिळतील. जसे तुम्ही डेटा सायंटिस्टची नोकरी हवी आहे तर तशा संज्ञा वापरा.
अर्ज प्रक्रिया सुलभ करा
तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या नोकरीसाठी अर्ज करताना एकदम सोप्या पद्धतीने करा. सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्यावळ ठेवा. त्यानंतर फक्त तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहे. यामुळे तुम्हाला सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
फॉलो अप घ्या
तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज केला आहे त्याचा फॉलो अप घ्यायला विसरु नका.तुम्ही ई-मेल किंवा कॉलद्वारे फॉलो अप घेऊ शकतात.
मुलाखतीसाठी तयारी (Interview Tips)
तुम्ही नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर मुलाखतीसाठी तयारी करा. मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करुन ठेवा. तसेच तुमचे व्यक्तिमत्व चांगले वाटेल, अशा पद्धतीने मुलाखतीसाठी जा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.