Jobs In IIT Saam Tv
naukri-job-news

Jobs In IIT: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार १७७००० रुपये; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Jobs In IIT 2024: आयआयटी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयआयटीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयआयटीमधून पदवी प्राप्त करावी, असे अनेक तरुणांचे स्वप्न असते. दरम्यान, आता आयआयटीमध्येच नोकरीची चांगली संधी आहे.

आयआयटीमध्ये असिस्टंट रजिस्ट्रार, टेक्निकल ऑफिसर, ज्युनिअर अकाउंट ऑफिसरसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी iitbhilai.c.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ होती. दरम्यान, ही तारीख वाढवून २३ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे.

आयआयटी भिलाई येथील ही भरती नॉन टीचिंग स्टाफ आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल पदांसाठी केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मास्टर्स/ पोस्ट ग्रॅज्युएशन / पीएचडी / एमई / एमटेक / ग्रॅज्युएट / एम कॉम पदवी प्राप्त केलेली असावी. रजिस्टार पदासाठी टायपिंग स्पीड असणे गरजेचे आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.(IIT Job)

या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला २१७०० ते १७७५०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा, मुलाखत आणि स्कील टेस्टद्वारे केली जाणार आहे. (IIT Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT