IIT Bombay Student : मोठी बातमी! आयआयटी मुंबईच्या ८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२० लाखांचा दंड; नाटकात प्रभू श्रीराम अन् सीतामातेचा अपमान केल्याचा ठपका

IIT Bombay Student Fined For Raahovan Play Ram Sita Characters Derogatory: आयआयटी मुंबईच्या आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आलाय. रामायणातील पात्र चूकीच्या पद्धतीने दाखविल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
आयआयटी मुंबई
IIT Bombay Student Saam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

आयआयटी मुंबईच्या आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. संस्थेच्या वार्षिक कला मोहत्सवात रामायणावर आधारित नाटकातील मुख्य पात्राला अपमानित पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. हा प्रकार संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात घडला होता. या वर्षी मार्चमध्ये हा कार्यक्रम झाला होता. 'राहोवन' नावाचं नाटक या विद्यार्थ्यांनी सादर केलं होतं.

पदवीचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचा दंड तर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला (IIT Bombay Student) आहे. शिस्तभंग कृती समितीच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईने रामायणावर आक्षेपार्ह नाटक केल्याच्या आरोपावरून विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. या विद्यार्थ्यांवर सादर केलेल्या कार्यक्रमात श्रीराम प्रभू आणि सितामातेची पात्र चूकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप करण्यात आला (Play Ram Sita Characters Derogatory) होता. या नाटकावर इतर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला (Mumbai News) होता. त्यामुळेच शिस्तभंग कृती समितीच्या शिफारशीनंतर या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे.

आयआयटी मुंबई
IIT Mumbai News: आयआयटी मुंबईला मिळाली 160 कोटी रुपयांची देणगी, कोणी केली इतकी मोठी मदत?

या नाटकासंदर्भात केलेल्या तक्रारींमध्ये संस्कृती आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा उल्लेख होता. तक्रारीनंतक शिस्तपालन समितीची बैठक झाली. विचारविनिमय केल्यानंतर समितीनं विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली (IIT Bombay) आहे. या अंतर्गत वरिष्ठ विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार तर कनिष्ठ विद्यार्थ्यांकडून४० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात येत आहे. आठ विद्यार्थ्यांवर याप्रकरणी कारवाई केली गेली आहे.

आयआयटी मुंबई
Mumbai News: IIT, IIM मध्ये रात्रीचा दिवस करुन शिकला; मात्र, नोकरीला लागताच काही महिन्यांतच संपवलं जीवन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com