IIT Mumbai News: आयआयटी मुंबईला मिळाली 160 कोटी रुपयांची देणगी, कोणी केली इतकी मोठी मदत?

Mumbai News: आयआयटी मुंबईला मिळाली 160 कोटी रुपयांची देणगी, कोणी केली इतकी मोठी मदत?
IIT Mumbai News
IIT Mumbai Newsजयश्री मोरे
Published On

IIT Mumbai News: गेल्या काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईला ३१५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. या संस्थेत शिक्षणासाठी ५० वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. त्यानिमित्ताने ही रक्कम त्यांनी दिली होती.

नंदन नीलेकणी स्वत: याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. दरम्यान, आयआयटी मुंबई पुन्हा एकदा दानमध्ये मिळालेल्या रकमेमुळे चर्चेत आहे.

IIT Mumbai News
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींच्या मतदारसंघाचा घेतला आढावा, BJP चा पराभव करण्यासाठी तयारी सुरू

यावेळी संस्थेला जवळपास १६० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. विशेष म्हणजे यावेळी ही देणगी एका अज्ञात व्यक्तीकडून मिळाली आहे.  (Latest Marathi News)

आयआयटी मुंबईचे संचालक प्रोफेसर सुभासिस चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अज्ञात देणगीदार संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे सुभासिस चौधरी यांनी सांगितले.

IIT Mumbai News
Maharashtra Political News: भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे गटाला दे धक्का

तसेच, भारतीय शैक्षणिक जगतात ही एक अनोखी घटना आहे. जेव्हा अज्ञात व्यक्तीने १६० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही रक्कम ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबिलिटी रिसर्च हबच्या स्थापनेसाठी असल्याचे सुभासिस चौधरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com