Maharashtra Political News: भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे गटाला दे धक्का

BJP Mla Prasad Lad: भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे गटाला दे धक्का
Bjp Mla Prasad Lad Elected as President of Best the Electric Union
Bjp Mla Prasad Lad Elected as President of Best the Electric Union Saam Tv
Published On

Maharashtra Political News In Marathi:

आधी आमदार गेले, नंतर पक्ष आणि चिन्ह गेलं, यानंतरही अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. असे एकामागून एक अनेक धक्के उद्धव ठाकरे गटाला बसत आहे. यातच आता उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.

मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या ताब्यात असलेल्या व मान्यताप्राप्त असलेल्या बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषद सदस्य आणि श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांची एकमताने निवड करण्यात आली झाली आहे.

Bjp Mla Prasad Lad Elected as President of Best the Electric Union
Sharad Pawar News: अजित पवार आमचे नेते असे मी म्हणालोच नाही; शरद पवारांची थेट भूमिका; पण फुटीबाबतच्या विधानावर ठाम

ही निवड ५००० कामगारांनी केली असून, कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे असलेली ही युनियन आता भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.  (Latest Marathi News)

बेस्टच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी आमदार प्रसाद लाड यांची निवड झाल्यामुळे, उद्धव ठाकरे गटाला एकप्रकारे धक्का बसला आहे.

Bjp Mla Prasad Lad Elected as President of Best the Electric Union
Satara NCP Melava: एनसीपीच्या मेळाव्यात पालकमंत्र्यांवर हल्लाेबाेल; राेहित पवारांच्या प्रश्नावर शंभूराज देसाई बाेलणार का?

यापूर्वी ठाकरे गटाचे सुहास सामंत यांच्याकडे हे अध्यक्ष पद होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील आमदार लाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com