Sharad Pawar News: अजित पवार आमचे नेते असे मी म्हणालोच नाही; शरद पवारांची थेट भूमिका; पण फुटीबाबतच्या विधानावर ठाम

Sharad Pawar ON NCP Crisis: राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसून त्यांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत अजित पवार यांना पुन्हा संधी नसल्याचेही शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar on Ajit Pawar and NCP
Sharad Pawar on Ajit Pawar and NCPSAAM TV
Published On

ओंकार कदम, प्रतिनिधी..

Sharad Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचे विधान केले होते. शरद पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

आता शरद पवार यांनी 'मी असे बोललोच नसल्याचे' सांगत त्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे. तसेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसून त्यांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत अजित पवार यांना पुन्हा संधी नसल्याचे मोठे विधानही त्यांनी केले. (Maharashtra Politics)

Sharad Pawar on Ajit Pawar and NCP
Rajasthan Crime News: हे कसलं प्रेम! धावत्या दुचाकीवरुन शिक्षिकेवर तलवारीने सपासप वार; महिलेवर उपचार सुरू

काय म्हणाले शरद पवार...

'अजित पवार आमचेच नेते..' या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र दहिवडीमध्ये सभेदरम्यान शरद पवार यांनी असे मी म्हणालोच नाही.. असे स्पष्टिकरण दिले. "सुप्रिया सुळे (Supriya Sule) असे म्हणू शकतात, ते भाऊ- बहिण आहेत त्यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढू नका" असेही ते यावेळी म्हणाले.

अजित पवारांना पुन्हा संधी नाही...

तसेच यावेळी पुढे बोलताना "पक्षातून एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, त्यामुळे त्याला फूट म्हणता येणार नाही.. असे ते म्हणाले. तसेच पहाटेच्या शपथविधीवेळी त्यांना संधी दिली होती, मात्र आता परत संधी द्यायची नसते.." असे मोठे विधानही शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar on Ajit Pawar and NCP
Pune Crime: भरचौकात तरुणावर ३६ वार... १० वर्षापूर्वीच्या खून प्रकरणात चौघांना जन्मठेप; पुण्याला हादरवणारे हत्या प्रकरण काय?

केंद्र सरकारवर टीका...

दरम्यान, आज शरद पवार यांची माण तालुक्याच्या दहिवडीमध्ये (Dahiwadi) कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी सभेत बोलताना शरद पवार यांनी शेतकरी हिताच्या आड येणारे निर्णय घेणाऱ्यांना कधीही साथ देणार नाही.. अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका केली. तसेच आजपर्यंत कधीही कांद्यावर निर्यात शुल्क लागू झाली नव्हती..असा टोलाही शरद पवारांनी लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com