Satara NCP Melava: एनसीपीच्या मेळाव्यात पालकमंत्र्यांवर हल्लाेबाेल; राेहित पवारांच्या प्रश्नावर शंभूराज देसाई बाेलणार का?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र धर्म पाळला. त्यांनी त्याच्याशी प्रतरणा केली नाही असे आमदार राेहित पवार यांनी नमूद केले.
rohit pawar, shambhuraj desai, dhaiwadi, satara
rohit pawar, shambhuraj desai, dhaiwadi, satarasaam tv
Published On

Mla Rohit Pawar News : माण खटाव तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. ही स्थिती पाहण्यासाठी तसेच त्यावर उपाययाेजना करण्यासाठी तुमचे पालकमंत्री आले का हाे तालुक्यात असा प्रश्न उपस्थित करुन आमदार राेहित पवार (rohit pawar in dhaiwadi) यांनी साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंसह (shambhuraj desai) महाराष्ट्र सरकारवर ताेफ डागली. आमदार पवार हे दहिवडी येथे एनसीपीच्या (ncp melava) मेळाव्यात बाेलत हाेेते. (Maharashtra News)

rohit pawar, shambhuraj desai, dhaiwadi, satara
When Will Nafed Purchase Onion? कसला आलाय कांद्याला भाव अन् काय... घरी ठेवून सडण्यापेक्षा इथे आणून घातला; नाफेडवर नाराजीच

आमदार राेहित पवार म्हणाले सातारा हा शौर्य आणि मनात स्वाभिमान बाळगणारा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हांला शौर्य,स्वाभिमान आणि अन्याया विरोधात लढावे लागते हे सांगायला नवीन नाही. आज ज्या पद्धतीने भाजपकडून घर, पार्टी फोडली जात आहे त्यासाठी एकत्र आले पाहिजे असेही पवार यांनी नमूद केले.

rohit pawar, shambhuraj desai, dhaiwadi, satara
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणांगणात शाहू महाराज छत्रपतींनी उतरावे? वाचा सतेज पाटलांची भावना

आपल्या सर्वांचे पालकमंत्री तालुक्यात किती वेळा आले हाे असा प्रश्न आमदार पवार यांनी करुन राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले कांद्याचा प्रश्न असताना एक नेते जपानला गेले होते. दूसरीकडे एक नेता केंद्रात गेला. हे सारं लोक श्रेय घेण्यात मग्न आहेत. परंतु शेतक-यांवर आलेल्या संकटाचे त्यांना काही देणं घेणं नाही असे पवारांनी नमूद केले.

rohit pawar, shambhuraj desai, dhaiwadi, satara
Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

पवार साहेबांनी शेतकऱ्यांवर कधीच अशी परिस्थिती आणली नाही असे सांगत हा तेल लावलेला पैलवान आहे आणि या देशातील ताकदीच्या विरोधात हे लढत आहेत. बाकी स्थानिक नेत्यांचा आमच्यावर सोडून द्या मी आणि प्रभाकर देशमुख बघून घेऊ अशी टिप्पणी आमदार राेहित पवार यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com