When Will Nafed Purchase Onion? कसला आलाय कांद्याला भाव अन् काय... घरी ठेवून सडण्यापेक्षा इथे आणून घातला; नाफेडवर नाराजीच

जोपर्यंत नाफेड खरेदीसाठी उतरत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचे पत्र देखील येवल्यातील शेतकऱ्यांनी दिले आहे.
nashik, onion, nafed, farmers, apmc market, National Agricultural Co-operative Marketing Federation of India Ltd
nashik, onion, nafed, farmers, apmc market, National Agricultural Co-operative Marketing Federation of India Ltd saam tv
Published On

- अजय साेनावणे

APMC Market News : नाफेडने (National Agricultural Co-operative Marketing Federation of India Ltd) कांद्याला जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी भाव मिळू लागल्याने शेतक-यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. घरी कांदा ठेवून सडण्यापेक्षा ताे येथे आणून आम्ही घालत आहाेत अशी भावना नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांनी लासलगाव बाजार समिती (lasalgaon bazar samiti) येथे साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. (Maharashtra News)

nashik, onion, nafed, farmers, apmc market, National Agricultural Co-operative Marketing Federation of India Ltd
Tomato Price Drop In Nashik : बाजार समितीत टाेमॅटाेचा दर काेसळू लागला, जाणून घ्या महत्त्वाचे कारण

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी बहुंताश ठिकाणी कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले हाेते. मुंबई आग्रा आणि मालेगाव नगर महामार्ग देखील शेतकऱ्यांनी रोखून धरला हाेता.

nashik, onion, nafed, farmers, apmc market, National Agricultural Co-operative Marketing Federation of India Ltd
Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन झालं जागं, चांदशैली घाटातील दरड प्रवण क्षेत्रात बांधल्या जाणार संरक्षण भिंती

आज (शुकवार) लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाला. शेतक-यांची आक्रमकता लक्षात घेता लिलावाप्रसंगी माेठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बाजार समितीत नेहमीपेक्षा आज कांद्याची आवक कमी असल्याचे दिसून आले.

कांद्याला जास्तीतजास्त 2400 रुपये तर सरासरी 2150 रुपयांचा दर मिळाला आहे. दरम्यान नाफेड मात्र आज ही कांदा खरेदीत उतरलेले नाही.

nashik, onion, nafed, farmers, apmc market, National Agricultural Co-operative Marketing Federation of India Ltd
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणांगणात शाहू महाराज छत्रपती? काेल्हापूरसाठी शरद पवारांची रणनिती

येवला बाजार समिती शुकशुकाट

गेले तीन दिवस बंद असलेल्या बाजार समित्या काल गुरुवार रोजी कांदा लिलाव सुरू झाले मात्र नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत आंदोलन केले. जोपर्यंत नाफेड खरेदीसाठी उतरत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचे पत्र देखील येवल्यातील शेतकऱ्यांनी दिले आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी बाजार समितीमध्ये नाफेडने खरेदी करावी असे आदेश दिले असले तरी येवल्यातील बाजार समितीला (yeola bazar samiti) कोणत्याही प्रकारचे नाफेडचे पत्र प्राप्त झाले नसल्याने आज येवल्यात बाजार समितीत शुकशुकाट बघण्यास मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com