Uddhav Thackeray On Nitin Gadkari: पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन तयारी सुरू केली आहे. यातच ३१ ऑगस्ट रोजी विरोधकांच्या इंडिया आघडीची मुंबईत बैठक पार पडणार आहे. या बैठकीची तयारी उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून करत आहेत.
अशातच आता उद्धव ठाकरे गटाने राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाची कुठे जास्त ताकद आहे आणि वैयक्तिक कोणत्या जागेवर आपली ताकद आहे, याचा आढावा ठाकरे गटाकडून घेण्यात येत आहे.
यामध्येच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. बारामती प्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षाला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. (Latest Marathi News)
याबाबत कार्यकर्त्यांना आदेश देताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नागपूर लोकसभा मतदारसंघात मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला बळ देण्याची तयारी ठेवा.''
रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पक्ष उमेदवार देईल, तर नागपूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला मित्र पक्षाला बळ द्यावा लागेल, अशा सूचना ठाकरेंनी बैठकीत आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
त्यामुळे पुढील निवडणुकांची परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष बळकटीसाठी तयारी करा आपला पक्ष सुद्धा या लोकसभा मतदारसंघात वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.