Job At Google Saam Tv
naukri-job-news

Job At Google: गूगलमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी; मिळणार लाखोंचे वेतन; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

Siddhi Hande

गूगलमध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. जर तुम्हालाही गूगलमध्ये नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना इंटर्नशिप दिली जाते. दरवर्षी ही इंटर्नशिप दिली जाते.

गुगलच्या वेबसाइटवर करिअर सेक्शनमध्ये विंटर इंटर्न २०२५ची माहिती दिली आहे. ज्या तरुणांना गुगलमध्ये इंटर्नशिप करायची आहे त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

गूगल वेबसाइटनुसार, गूगल विंटर इंटर्नशिप ही जानेवारी २०२५ महिन्यात सुरु होणार आहे. ही इंटर्नशिप २२-२४ आठवड्यांसाठी असणार आहे. बॅचलर्स/ मास्टर्स डिग्री किंवा कॉम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षी असलेले तरुण या इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. तसेच ज्यांचा कोर्स २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे असे उमेदवारदेखील या इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

गूगल इंटर्नशिपसाठी ऑक्टोबर महिन्यात अर्ज करायचा आहे. या इंटर्नशिपसाठी असोसिएट, बॅचलर्स किंवा मास्टर डिग्रीसाठी एनरोल केलेले असावे. सॉफ्टवेअर डेव्लपमेंटसंबंधित टेक्निकल फिल्डमध्ये ट्रेनिंगचा अनुभव असावा. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव असावा.C,C++,Java,JavaScript,Python यासह अनेक प्रोगामिंग लँग्वेजच्या कोडिंगचा अनुभव असावा.

गूगलमधील या इंटर्नशिपसाठी तरुणांना लाखो रुपये पगार मिळणार आहे. गूगल इंटर्नशिप करणाऱ्या लोकांना ६०-७० हजार रुपये वेतन दिले जाते. त्यानंतर गूगलमध्ये इंटर्नशिप केल्यानंतर उमेदवारांना १०.६ ते १६.८ लाखांचे पॅकेज मिळते.

या इंटर्नशिपसाठी तुम्ही गूगलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. वेबसाइटवर करियर सेक्शनवर जाऊन तुमचा सीवी आणि कोर्ससंबंधित माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे का? तुम्ही कोणत्या वर्षाचे विद्यार्थी आहात याबाबत माहिती द्यायची आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar: सईचे फोटो पाहून काळजाचं झालं पाणी पाणी

Health Tip: रात्री झोपताना पाणी पिण्याचे फायदे!

Maharashtra News Live Updates : पुण्यातील खडकवासला धरणावर कपडे धुण्यासाठी गर्दी

Shweta Tiwari Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! श्वेताचे फोटो पाहून फिदा

Papaya Eating Benefits : पपयी खा आणि निरोगी राहा; वाचा चकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT