आधुनिक युगामध्ये इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे. सर्वच युजर्स गुगल या सर्च इंजिनचा सर्वाधिक वापर करतात. काही अडलं नडलं की आपण गुगलची मदत घेतो. या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या आयुष्यात गुगलचं विशेष स्थान आहे. अशातच या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये एका आगळ्यावेगळ्या कथानक असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे. येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला 'गुगल आई' नावाचा चित्रपट येतोय. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे.
नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक जबरदस्त टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये एक लहानगी मुलगी आणि तिचे आईवडील असं सुखी कुटुंब दिसत आहे. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमकं त्या कुटुंबात काय घडतं ? हे 'गूगल आई' या कुटुंबाला कसे बाहेर काढते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. दरम्यान हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट असून यात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह यांनी सांगितलं की, "एका लहानग्या मुलीचे चित्रपटातील कथानक आहे. संकटात अडकलेल्या कुटुंबाला 'गूगल आई' कसे बाहेर काढते ? हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडले आहे आणि त्यांची सुटका कशी होणार? हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे." डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत 'गूगल आई'ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केले असून डॉलर्स दिवाकर रेड्डी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.