IPPB Recruitment Saam Tv
naukri-job-news

IPPB Recruitment: ग्रॅज्युएट आहात? इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

IPPB Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी आहे. असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधधी

असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती

३०९ पदांसाठी भरती जाहीर

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी बँकेतील नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ३०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनिअर असोसिएट पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी १ डिसेंबरपूर्वी अर्ज करावेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

पात्रता

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतील या नोकरीसाठी ippbonline.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. ३०९ पदांसाठी भरती केली जाणार आहे. २० ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतील या https://saamtv.esakal.com/topic/jobसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल असावे. याचसोबत ग्रुप सी किंवा ग्रुप बी पदावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा. असिस्टंट मॅनेदर पदासाठी ग्रॅज्युएशन केलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. उमेदवाराला ५ वर्षांचा कामाची अनुभव असावा.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ippbonline.bank.in वेबसाइटवर जावे.

यानंतर Current Openingsवर जाऊन संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.

यानंतर Apply Nowवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे. यानंतर माहिती भरावी.

यानंतर लॉग इन करुन स्वतः ची माहिती भरावी.

फोटो, सही आणि माहिती भरुन फॉर्म अपलोड करावा. त्यापूर्वी तुम्ही प्रिंट आउट काढून ठेवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Puri Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट तयार करा चटपटीत दही पुरी रेसिपी

Cotton Saree Contrast Blouses: साध्या कॉटन साडीला स्टायलिश लूक देणार 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

SCROLL FOR NEXT