Indian Overseas Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

IOB Recruitment: इंडियन ओवरसीज बँकेत सरकारी नोकरीची संधी; पगार मिळणार १,०५,२८० रुपये; अर्ज कसा करावा?

Indian Overseas Bank Recruitment: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ओवरसीज बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन ओवरसीज बँकेत भरती

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

मिळणार १ लाख ५ हजार रुपये पगार

बँकेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओवरसीज बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ओवरसीज बँकेत सध्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहे.

इंडियन ओवरसीज बँकेत भरती (Indian Overseas Bank Recruitment)

चांगल्या सरकारी बँकेत ऑफिसर होण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. www.iob.in या वेबसाइटवर तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता (Eligibility)

इंडियन ओवरसीज बँकेतील या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. पदानुसार इंजिनियरिंग/ ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन / CA/ CMA/ ICWA/ CFA किंवा एमबीए केलेले असावे. पदानुसार पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे तुमच्या पात्रतेनुसार वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिकृत अधिसूचना वेबसाइटवर दिली आहे.

पगार

एमएमजीएस-II साठी निवड झालेल्या उमेदवारांना ६४,८२० रुपये पगार मिळणार आहे. अनुभवानुसार ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे. तर एमएमजीएस-III (Middle Management Grade Scale III) पदासाठी ८,९२० रुपये ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे.

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे.त्यामध्ये निवड झाल्यानंतरच तुमची निवड होईल. दरम्यान, यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पुढे मालगाडी थांबली; CSMT कडे जाणाऱ्या ट्रेन खोळंबल्या

Orange Barfi: फक्त 'हे' ३ पदार्थ वापरा अन् संत्रा बर्फी बनवा, वाचा सोपी रेसिपी

Weather Update : परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, अहिल्यानगरमधील शाळांना २ दिवस सुट्टी

Paresh Rawal: 'मी असा अभिनेता नाही, ज्याला वाटतं....'; 'हेरा फेरी ३'च्या शूटिंगबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

वक्फ कायदा कायम, ३ सदस्य राहणार बिगर मुस्लिम, पण ५ वर्षांच्या 'त्या' अटीवर SC चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT