RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

RBI Grade B Officer Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
RBI
RBISaam Tv
Published On
Summary

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी भरती सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

सरकारी नोकरी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आरबीआयने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. (RBI Recruitment)

RBI
Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; २८०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील (Reserva Bank Of India) या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

आरबीआय ग्रेड बी पदांसाठी एकूण १२० जागा भरती करणार आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या जनरल, DISM, DEPR विभागात ही भरती केली जाणार आहे. चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे.

आरबीआय ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. इकोनॉमिक्स, फायनान्समध्ये मास्टर्स, पीजीडीएम किंवा एमबीए डिग्री प्राप्त केलेली असावी.

RBI
Sleep Job Offer: '9 तास झोपा अन् 10 लाख कमवा'; प्रसिद्ध कंपनीची भन्नाट ऑफर

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वयोगटातील असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा होणार आहे.१८-१९ ऑक्टोबर या कालावधी फेज १ परीक्षा होणार आहे. त्यानंतर ६-७ डिसेंबर रोजी फेज २ परीक्षा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी परीक्षेची तयारी करावी.

RBI
Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com