Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून अधिक पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Job Recruitment News : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या पदासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल, जाणून घ्या .
Job Recruitment
Job Recruitment NewSaam tv
Published On
Summary

AAI मध्ये 976 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

शैक्षणिक पात्रता इंजिनीअरिंग / टेक्नोलॉजी / संगणक शाखेतील पदवी आणि GATE स्कोअर आवश्यक असणार

वयोमर्यादा – 27 वर्षे, आरक्षण वर्गासाठी सूट लागू असणार

पगार आणि भत्ते – ₹40,000 ते ₹1,40,000 पर्यंत वेतन निश्चित

एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाकडून नोकरी भरतीविषयी नोटीसही जारी करण्यात आली आहे. एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियात 'ज्युनिअर 'एक्झिक्युटिव्ह'च्या एकूण ९७६ पदांसाठी नोकरभरती होत आहे. या नोकरीसाठी २८ ऑगस्ट २०२५ रोजीपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर या नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कोणते उमेदवार आहेत पात्र?

या नोकरीसाठी उमेदवारांना आर्किटेक्चर/इंजिनीअरिंग/टेक्नोलॉजी/कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या आयटी विषयातील पदवी अनिवार्य आहे. तसेच गेट (Gate)स्कोर आवश्यक आहे.

Job Recruitment
Nepal Protest : गृहमंत्री, पंतप्रधानांचा राजीनामा; नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणणारा ३६ वर्षीय तरुण कोण?

वयाची मर्यादा काय?

नोकरीसाठी उमेदवारांना आयुमर्यादा २७ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना वयाच्या अटीत सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना वयाच्या अटीत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी उमेदवारांना वयाच्या अटीत ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर दिव्यांग उमेदवारांना वयात १० वर्षांची सूट देण्यात आली आहे.

पगार किती?

एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियामधील या पदासाठी ४०,००० रुपये ते १४०,००० रुपये प्रति महिना वेतन निश्चित करण्यात आला आहे. तसेच नियुक्तीनंतर इतर भत्ते आणि सुविधांचाही लाभ मिळणार आहे.

Job Recruitment
Akola Crime : अकोला हादरलं! चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सकल हिंदू आक्रमक

अर्ज कसा करणार?

उमेदवाराला पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट www.aai.aero वर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर RECRUITMENT OF JUNIOR EXECUTIVES THROUGH GATE" लिंकवर क्लिक करावं लागेल. आता रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड लॉगिन करावी लागेल. त्यानंतर वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी लागेल. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. फॉर्म सबमिट करण्याआधी भरलेली माहिती तपासून घ्या. त्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com