
नेपाळमध्ये लाखोंच्या संख्येने तरुण रस्त्यावर
सुदन गुरुंग याच्या नेतृत्वाखाली आंदोलन
सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात तरुणांमध्ये संतापाचा उद्रेक
पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांकडून राजीनामे
नवी दिल्ली : नेपाळमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडिया बंदीनंतर तरुणांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. नेपाळमधील आंदोलनाची रुपरेषा काही दिवस आधीच तयार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. नेपाळमधील तरुणाच्या आंदोलनामागे एक तरुण चेहरा असल्याची माहिती मिळत आहे. सुदन गुरुंग असे तरुणाचे नाव आहे.
सुदन गुरुंग नावाच्या तरुणाच्या नेतृत्वात नेपाळमधील लाखो तरुण रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळत आहे. या आंदोलनात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २५० हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान, गृहमंत्री, कृषिमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
नेपाळमध्ये तरुणांच्या मनात आधीच सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात संताप होता. त्यात सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुणांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली. सुदन गुरुंगने नेपाळमधील तरुणांना एका व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम केलं.
सुदन गुरंग आधी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करायचा. २०१५ साली झालेल्या नेपाळमधील भूकंपामुळे त्याचं आयुष्य बदललं. सुदन गुरुंगने स्थानिक लोक चळवळीत सामील झाला. त्याने हामी नेपाळची स्थापना केली. त्याची संघटना २०१५ वर्षांपासून सक्रिय होती. मात्र, त्याच्या संघटनेची नोंदणी २०२० साली झाली.
हामी नेपाळ संघटनेने देशातील तरुणांना जोडण्याचं काम केलं. त्याच संघटनेच्या माध्यामातून त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून ८ सप्टेंबर रोजी आंदोलनात सामील होण्याचं आवाहन केलं. पोस्टमध्ये म्हटलं की, 'बहीण आणि भावांनो, ८ सप्टेंबर तो दिवस आहे, जेव्हा नेपाळमधील तरुण आवाज उचलतील. आता आपली वेळ आहे. आपली लढाई आहे. ही लढाई युवकांपासून सुरु होईल'.
नेपाळमध्ये या पोस्टनंतर तरुण पेटून उठले. त्यांनी ८ सप्टेंबर रोजी आंदोलन केलं. आंदोलकर्ते व्हीपीएनचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर लाखो तरुण रस्त्यावर उतरले. आतापर्यंत तरुणांनी मंत्र्यांच्या घराची तोडफोड केली आहे. तर संसद देखील पेटवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.