Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र असल्याचं पटना कोर्टाने म्हटलं आहे.
marriage promise case update
marriage promise case Saam tv
Published On
Summary

घटस्फोटित महिलेला दुसऱ्या पतीकडून पोटगीचा अधिकार असल्याचं पटना हायकोर्टाने म्हटलं

कौटुंबिक न्यायालयाकडून दरमहा २० हजार रुपयांचा पोटगीचा आदेश रद्द

कोर्टाने पोटगी ठरवण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची संपत्ती तपासण्याचा आदेश

अर्जदाराने पत्नीवर फसवणुकीचा आरोप केलाय

पटना हायकोर्टाने एका घटस्फोटित महिलेच्या बाबतीत मोठा निर्णय दिला आहे. घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडून पोटगी घेण्यास पात्र असल्याचे हायकोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने पत्नीला दिलेल्या दहमहा २० हजार रुपयांच्या पोटगीचा आदेश रद्द केला. त्यानंतर पोटगीची रक्कम ठरवण्याआधी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती घ्यावी, असा आदेश कोर्टाने कुटुंबाला दिला आहे. न्यायमूर्ती विवेक चौधरी यांच्या एकलपीठाने रवि प्रकाश सक्सेना उर्फ रवि प्रकाश यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणीवर हा आदेश दिला.

अर्जदाराच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, 'अर्जदाराची पत्नीशी ओळख ह एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर झाली होती. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. 'पत्नीला पहिल्या घटस्फोटाच्या वेळी ४० लाख रुपये मिळाले होते. तिच्याकडे स्वतंत्रपणे भरणपोषणासाठी संपत्ती आहे, असे अर्जदाराच्या वकिलांचं म्हणणं आहे. 'पत्नीने केवळ पोटगीत चांगली रक्कम मिळवण्यासाठीच विवाह केलाय. ती अनेकांना फसवण्याच्या उद्देशाने लग्न करते, असा आरोप अर्जदाराने केलं आहे.

marriage promise case update
Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

अर्जदाराचं पत्नीसोबत संबंध तणावपूर्ण असताना तिने दुसऱ्या व्यक्तीला पती म्हणून शोधायला सुरुवात केली. दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा तिचा मानस होता. पत्नीला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कौटंबिक न्यायायलयाने केला होता. तर महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून पोटगी म्हणून ४० लाख रुपये मिळाले होते. तसेच ती स्वत:च्या उपजीवकेसाठी शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत पात्र आहे. तसेच पत्नी चांगलं जीवन जगण्यासाठी आवश्यक कमाई करण्यासही सक्षम आहे,असाही अर्जदाराचा दावा आहे.

अर्जदाराचं म्हणणं आहे की, 'त्याच्यावर वृद्ध आणि आजारी आई-वडिलांची जबाबदारी आहे. ज्यांचं वय अनुक्रमे ८० आणि ७५ वर्षे इतके आहे. लग्नाच्या वेळी पत्नीने स्वत:ला अविवाहित असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच तिने शपथपत्रही सादर केलं होतं. दोघांचा विवाह १६ फेब्रुवारी २०२० रोजी गाझियाबाद येथे झाला होता. त्यांचं लग्न हे आर्य समाज मंदिरात हिंदू वैदिक पद्धती आणि धार्मिक विधीनुसार झालं'

marriage promise case update
ONGC Project Fire : उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग; हवेत धुरांचे लोट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्याच्यावर त्याच्या वृद्ध आणि आजारी आई-वडिलांची जबाबदारी आहे, ज्यांचे वय अनुक्रमे ८० आणि ७५ वर्षे आहे. विवाहाच्या वेळी पत्नीने स्वतःला अविवाहित असल्याचे जाहीर करत एक शपथपत्र सादर केले होते. त्यांचा विवाह १६ फेब्रुवारी २०२० रोजी, गाझियाबाद येथील आर्य समाज मंदिरात हिंदू वैदिक पद्धतीने आणि धार्मिक विधींनुसार पार पडला होता. 'योग्य कारण नसताना पतीसोबत नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीला भरणपोषण मिळण्याचा अधिकार नाही, असंही अर्जदाराचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com