ONGC Project Fire : उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग; हवेत धुरांचे लोट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Uran ONGC Project Fire: उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागलीये. या आगीच्या घटनेत नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
ONGC Project
ONGC Project Fire update Saam tv
Published On
Summary

उरणमधील ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग

आग लागल्यावर सीआयएसएफ, सिडको आणि अग्निशमन दल घटनास्थळी

आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले

प्रकल्पातील कर्मचारी सुरक्षित

उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या प्रकल्पाला लागलेल्या आगीचे लोट हवेत पसरले आहेत. ओएनजीसी प्रकल्पाला आग लागल्याची घटना घडताच सीआयएसएफ, सिडको, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या आगीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे

उरणमधील महत्वाचा आणि संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या ओएनजीसी प्रकल्पाला आग लागून भडका उडाला. आग विझविण्यासाठी सीआयएसएफ आणि सिडको, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर काही नागरिकांकडून भीतीपायी संताप व्यक्त केला जात आहे.

ONGC Project
ONGC Project Fire : उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग; हवेत धुरांचे लोट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

उरणमधील सर्वात मोठं ओएनजीसी हे नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकारण केंद्र आहे. या केंद्रातून नैसर्गिक वायू आणि तेल वितरण करण्यात येतं. भारत सरकारकडून हा प्रकल्प संचालित आहे. प्रकल्पाला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने प्रकल्पसंदर्भात अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित राहत आहेत. घटनेची तीव्रता पाहता प्रकल्पतील कर्मचारी आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ONGC Project
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. आगीवर नियंत्रण मिळवताना प्रकल्पातील कर्मचारी आणि आजूबाजूचा परिसर देखील रिकामा केला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविल्याने प्रकल्पातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ONGC Project
WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com