Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला
कुटुंबातील टोळीयुद्धात वनराज आंदेकरच्या सूडासाठी आयुष कोमकरचा गोळ्या झाडून हत्या
कारागृहात शिक्षा भोगत असलेले गणेश कोमकर मुलाच्या अंत्यविधीसाठी हजर
आयुषने लिहिलेलं “आय लव्ह यू पप्पा” असं भावनिक भेटकार्ड वडील गणेश अंत्यसंस्कारावेळी घेऊन आला होता
सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे : माझी चूक नाही. मला गोळ्या घाला, असं म्हणत आज गणेश कोमकरने मुलाला अग्नी देताना ढसाढसा रडला. पुण्यातील नानापेठ परिसरात आंदेकर आणि कोमकर यांच्या वादात आजोबाने लेकाचा बदला घेण्यासाठी नातवाची हत्या केली. आंदेकरच्या टोळीने वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकरला गोळ्या झाडून संपवलं. अखेर तीन दिवसांनी मृत आयुषवर वैकुंठ स्मशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयुषचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता. अंत्यसंस्कारासाठी पॅरोलवर सुटलेले वडील गणेश कोमकर मुलाच्या अंत्यविधीत सामील झाले . आयुषच्या अंत्यसंस्कारावेळी वातावरण शोकाकुल झाले होतं. वनराज आंदेकर हत्या प्रकरणी गणेश कोमकर वर्षांपासून नागपुरातील कारागृहात शिक्षा भोगतो. आंदेकर हत्या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या गणेशवर स्वतःच्या मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अंत्यसंस्कारावेळी गणेशच्या हातात असलेल्या भेटकार्डाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. गणेश हा मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यविधीसाठी वैकुंठात आला होता.
गणेशच्या साधं भेटकार्ड नव्हतं. तर लेक आयुषनं स्वतः कारागृहात वडील गणेशला पाठवलेलं भेटकार्ड होतं. 'आय लव्ह यू पप्पा' असं कार्डावर आयुषनं लिहिलं होतं. 'नवीन ड्रेस पाठवलाय' असेही त्याने लिहिलेलं होतं. या भेटकार्डासोबत त्याने बालपणीचे फोटो चिकटवले होते. वडिलांच्या प्रेमासाठी आतुर झालेल्या मुलाची अखेरची भेट ठरली. माझी काही चूक नव्हती. काही चूक नसताना माझ्या मुलाला एका भोगाव लागलं, असं गणेश हा पोलिसांना विचारत होता.
कुटुंबात सुरु झालं टोळीयुद्ध
पुणे जिल्ह्यातील हे टोळीयुद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरु झालं. सख्ख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली. त्यानंतर आता आंदेकर टोळीने सख्ख्या भाच्याचा खून केला. लेकाने दिलेले भेटकार्ड गणेशने मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयाशी घट्ट धरून ठेवल्याचं दिसून आलं. गणेशने लेकाची शेवटची आठवण सर्वांना दाखवली. तुझी शेवटची भेट मी जपून ठेवल्याचं सांगण्यासाठी गणेश भेटकार्ड घेऊन आला होता.
बालपणापासूनचे दोघांचे एकत्रित फोटो त्या कार्डात होते. गणेश कोमकरच्या हातातील भेटकार्ड पाहून उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावातील मंडळी हळहळले. वनराजच्या हत्येनंतर आंदेकर-कोमकर कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. याच आंदेकर-कोमकर संघर्षामध्ये एका निरागस जीवाचा बळी घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.