Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईची सत्ता मिळणं अवघड; कुणी केला दावा?

Ramdas Athawale News : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मोठं भाष्य केलं आहे. दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईची सत्ता मिळणं अवघड असल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.
Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Uddhav Thackeray and Raj ThackeraySaam Tv
Published On
Summary

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवणं कठीण असल्याचा रामदास आठवले यांचा दावा

महायुती ही निवडणुकीत निश्चितच विजयी होईल, असं आठवले म्हणाले.

ओबीसी आरक्षणावरून त्यांनी इशारा दिला की ओबीसींवर अन्याय होऊ नये, असे ते म्हणाले.

'देवाभाऊ' पोस्टर प्रकरणात आठवलेंचं फडणवीसांना समर्थन

संजय जाधव, साम टीव्ही

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र, ठाकरे बंधू एकत्र आले तरी राज आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईची सत्ता मिळणं अवघड आहे, असा दावा मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले यांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. आठवलेंनी यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 'शिवाजीपार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा असतो. त्यात राज ठाकरेंना बोलावलं जाऊ शकतं. पण जरी दोन्ही एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलाही फरक पडणार नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईची सत्ता मिळणं अवघड आहे. मुंबई महापालिका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही'.

Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

ओबीसी आरक्षणावर म्हणाले की, 'ओबीसी समाजाला आधीच आरक्षण कमी मिळालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको. मराठा समाजाला यापूर्वीच दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू केलं तरी सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही'.

Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Shocking : १५ दिवसांच्या मुलाला फ्रिजरमध्ये ठेवून आई झोपी गेली; महिलेच्या कृत्याने खळबळ

अॅट्रोसिटी अॅक्टवरही आठवले यांनी भाष्य केलं. 'ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये बरेच अमेंडमेंट झालेले आहेत. तसेच दलित समाजही मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. मात्र ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व्हायला नको. निरपराध मराठा आणि उच्चवर्णीयांवर अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल व्हायला नको अशी आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Online Food Delivery : ऐन सणासुदीच्या हंगामात महागाईची फोडणी; ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महागणार?

देवेंद्र फडणीसांच्या 'देवाभाऊ पोस्टर'वरही आठवले यांनी भाष्य केलं. 'श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही, ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं. ब्राह्मण असतानाही त्यांनी हा निर्णय घेतलाय. सत्तर वर्षात अनेक मराठा मुख्यमंत्री राहिले. मात्र मराठा मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला नव्हता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतल्यामुळे त्यांचे पोस्टर लागलेच पाहिजेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com