
२२ सप्टेंबरपासून ऑनलाइन फूड डिलिव्हरीवर १८% जीएसटी लागू होणार
झोमॅटो, स्विगी व मॅजिकपिन डिलिव्हरी चार्ज वाढवण्याची शक्यता
मॅजिकपिनकडून ₹१० शुल्क कायम
ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरमागे अतिरिक्त ₹२ ते ₹३ मोजावे लागण्याची शक्यता
सणासुदीच्या हंगामात झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकिपन अॅपमधून ऑनलाइन जेवण मागवणे महागात पडणार आहे. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडून ऑनलाइन ऑर्डरमागे शुल्क वाढवण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य अॅपधारकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्जवर १८ टक्के जीएसटी लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची फोडणी बसण्याची शक्यता आहे.
स्विगीने बाजारात प्लॅटफॉर्म चार्ज जीएसटीसहित १५ रुपये लागू आहे. झोमॅटने जीएसटी वगळता प्लॅटफॉर्म शुल्क १२.५० रुपये लागू आहेत. तर मॅजिकपिनकडून प्रति ऑर्डरमागे १० रुपये शुल्क लागू असणार आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून डिलिव्हरी शुल्क १८ टक्के जीएसटीमुळे झोमॅटो युजर्सला प्रति ऑर्डर दोन रुपये केले आहेत. स्विगी ग्राहकांवर २.६ रुपयांचा अतिरिक्त बोझा पडणार आहे. मात्र, याबाबत स्विगी आणि झोमॅटोकडून कोणतीही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही.
मॅजिकपिनच्या प्रवक्त्याने सांगितलं की, 'ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यावर १८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. जीएसटीत बदल झाला तरी आमच्या शुल्कामध्ये बदल होणार नाहीत. जीएसटी वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही प्रत्येक ऑर्डरमागे १० रुपये घेणार आहोत. हे शुल्क इतर कंपन्यांपेक्षा कमी आहे'.
स्विगी : प्लॅटफॉर्म शुल्क १५ रुपये (जीएसटीसह) ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक ऑर्डरवर सुमारे २.६ रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे.
झोमॅटो : प्लॅटफॉर्म शुल्क १२.५० रुपये (जीएसटीशिवाय) ठेवले आहेत. जीएसटी लागू केल्यावर प्रति ऑर्डर २ रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.
मॅजिकपिन : प्रत्येक ऑर्डरवर १० रुपये शुल्क घेत राहतील. मात्र, जीएसटीचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर टाकला जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.